उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापून अरविंद सावंतांना तिकीट दिलं; शिंदे गटात जाताच किर्तीकरांचा गंभीर आरोप

'शरद पवार आणि महाविकास आघाडीची मध्यस्थी संजय राऊत करायचे.'
Maharashtra Politics
Maharashtra Politics esakal
Updated on
Summary

'शरद पवार आणि महाविकास आघाडीची मध्यस्थी संजय राऊत करायचे.'

Maharashtra Politics : शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचं चित्र निर्माण झालंय. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय.

गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज गजानन किर्तीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले आहेत. किर्तीकर म्हणाले, 'शिंदे गटानं जो उठाव केला तो अगदी योग्य आहे. अडीच वर्षांत आम्हाला सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळालं. मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत होतं. नगरला सर्व अधिकारी त्यांच्याच मर्जीतील होते.'

Maharashtra Politics
Shraddha Murder Case : मुस्लिम तरुण हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढताहेत; भाजप नेत्याला 'लव्ह जिहाद'चा संशय

माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माझं तिकीट कापून अरविंद सावंत यांना तिकीट दिलं, असा खुलासा त्यांनी केलाय. शिंदे साहेब, तुम्ही उत्तम काम करा. मी संघटना बांधण्याचं काम करेन. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आण्याचं काम करेन. माझ्या जागेवर एका सिनेअभिनेत्याला आणलं गेलं, ते म्हणजे अमोल कोल्हे ते अनुभवी आहेत का? असा सवाल त्यांनी केलाय.

Maharashtra Politics
Shraddha Murder Case : आई-वडिलांसोबतच्या शेवटच्या संवादात श्रद्धा म्हणाली, विसरा मी तुमची मुलगीये अन् तिनं..

आढळराव पाटील म्हणजे आक्रमक चेहरा आहेत. अमोल कोल्हेंच्या मालिकांमुळं लोक आकर्षित झाले आणि आढळराव हरले. तर, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रियांका चतुर्वेदींना देखील ६ महिन्यात राज्यसभा दिली. मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो. माझ्यावर अन्याय होत असून, माझा अपमान होत होता. कारण, मी निष्ठावान होतो.

शिंदेंनी उठाव केला आणि त्यांना खोक्यावरून हिणवलं जात आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे जर भाजपनं अडीच वर्षानंतर दिलं नसतं, तर बघितलं असतं. त्यावेळी राष्ट्रवादीबरोबर कशाला जायचं? योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायला लागला. याबाबत मी माझ्या मुलालाही सांगितलं होतं. मी माझ्या मुलाला शिंदे गटात ये म्हणून सांगणार नाही. त्याला त्याचा अनुभव येऊ दे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Politics
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

किर्तीकर पुढं म्हणाले, संजय निरुपमला (Sanjay Nirupam) मी पावणे ३ लाख मतांनी हरवलं होतं. हेच निरुपम म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील ताईत झाले. २०२४ मध्ये त्यानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, मी त्यांना पावणे ४ लाख मतांनी हरवेल, असा इशारा निरुपम यांना दिला. शरद पवार आणि महाविकास आघाडीची मध्यस्थी संजय राऊत करायचे. पक्ष प्रमुखांना हाताशी धरायचे आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. पुण्यात शिवसेनेचा बेस नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण, असं नाही. मी संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी ३ वेळा फोन केला, पण त्यांनी उचलले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.