Gajanan Taur Case: खोतकरांचा कट्टर समर्थक ते सराईत गुन्हेगार! कोण आहे गजानन तौर?

राजकीय वरदहस्त असणाऱ्या गजाननच्या हत्येमागचं कारण काय?
Gajanan Taur Case
Gajanan Taur Case
Updated on

Gajanan Taur Case: ११ डिसेंबर २०२३ भरदुपारची २ वाजताची वेळ जालना शहर हादरलं ते भरचौकातील गोळीबाराच्या घटनेनं. गजानन तौर या तरुणाची तिघांनी गोळीबार करुन हत्या केली. हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तौर याला राजकीय वरदहस्त होता. त्यामुळे गजानन तौर नेमका कोण? त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊ...  

गजानन मछींद्र तौर जालन्यातील रहिवाशी आहे. या परिसरात त्याची जालन्याचा किंग अशी त्याची ओळख आहे. सोशल मिडीयावरचे त्याचे हे व्हिडीओ त्याची दहशत सांगतात. जेव्हा हत्येनेतंर तौरचा मृतदेह रूग्णालयात आणला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा मृत व्यक्ती गजानन तौर  कट्टर समर्थक.  खोतकरांसोबत गजानन बऱ्याचदा पाहिला गेलाय. एवढंच काय जेव्हा गजाननची हत्या झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी अर्जुन खोतकरही तिथे होते.

गजानन तौर हा सराईत गुन्हेगार, २०११ पासून आतापर्यंत त्यांच्यावर १६ केसेस आहेत. खंडनी, भांडणं , आणि हत्येचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.  १ वर्ष NPD अंतर्गत त्याने जेलची शिक्षाही भोगली होती. तो तडीपारही होता.

दरम्यान गजाननचा मित्र  माऊली मागंडे यांनं दिलेल्या माहितीनुसार.  हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे 10 डिसेंबरला रात्री 08.00 वा. सुमारास  गजानन  त्याच्या घरी गेला.  तेव्हा शेजारील मुलांनी सांगितलं की, तुला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय.  तेव्हा गजाननने घराचे CCTV फुटेज पाहीले, या CCTV फुटेजमध्येसात ते साडेसात वाजेच्या सुमारास भागवत डोंगरे व टायगर आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती घरी आले.  गजानने माऊलीला सांगितले,  टायगर आणि त्याची ओळख ही जेलमध्ये झाली होती.  

तर ११ डिसेंबरला गजानन तौर आपला मित्र पवन दिवेकर, आलोक जुन्नरकर सोबत दुपारी 01.00 वाजता रामनगर साखर कारखान्याकडून कारने  जालना शहराकडे येत होते.  दुपारी दिड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास मंठा चौफुली जवळ संमती मेडीकल समोर एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर गाडी जवळ भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर व ईतर दोन अनोळखी उभे होते. गजानननं त्यांना पाहून आलोक जुन्नरकरला गाडी थांबवण्यास सांगितली. आणि त्या तिघांजवळ गेले. तिथे जाताच भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर यांनी पिस्तुलने गजाननच्या दिशेने गोळ्या मारायला सुरुवात केली.

Gajanan Taur Case
Maratha Reservation: "मराठा आरक्षणाचा विषय निकाली लागू नये हा डाव"; मागासवर्ग आयोगातील सदस्यांवर फडणवीसांचा आरोप

गजाननचे मित्र त्याच्याकडे जायला प्रयत्न करताच त्यांच्यावरही आरोपींनी गोळ्या झाडल्या. आरोपींमधील दोघांनी चाकुने गजाननच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी असतानाही गजाननने तो चाकु त्याच्या हातातुन हिस्कावुन घेतला व त्या पैकी एकाला चाकूने मारले आहे. यातच डोक्यात गोळी लागल्याने गजानन खाली पडला आणी ते सगळे अजुबाजुला पळुन गेले. गजाननवर गावठी पिस्तूलातून ५ फायर राऊंड करण्यात आले होते. गजानन बेशुध्द अवस्थेत असाताना त्याला कलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरने सरकारी दवाखान्यात घेवुन जा असे सांगितले. सरकारी दवाखान्यात नेताच गजानन मृत पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गजाननला लागेल्या चार गोळ्यापैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या, तर दोन त्यांच्या अंगाला चाटून गेल्या.  जुन्या भांडणातून गजाननची हत्या झाल्याचं समजतंय. (crime news)


पोलीसांना मिळालेल्या पुराव्यात, गजाननच्या हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे  याच्या वॉट्सअप बायोमध्ये एक लाईन होती जालना किंग को टपकाना एक ही सपना. आणि ही लाईन  २६ ऑक्टोबरला टाकण्यात आली होती याचाच अर्थ गजाननच्या हत्येची प्लॅनिंग खुप आधीपासून सुरु होती. गजाननच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, गजानन ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आणि त्यांची ओळख झाली होती.आणि तिथेच त्यांचे वाद झाले होते. आणि या वादाच्या सुडातूनच गजाननची  हत्या झाल्याचा संशय पोलीसांना आहे.  या प्रकरणात भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे व टायगर या तिघांसह अन्य दोन असे एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर यातील एका संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यातही घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

 
जिल्ह्यात मागील अकरा महिन्यात तब्बल ४८ खून झाले आहेत. यातील तीन खुनाच्या गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. शिवाय विविध गुन्ह्यांत गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. जालन्यातील या वाढत्या गुन्हेगारीमुळे  पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित धाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()