Ganesh Chaturthi 2024 Updates: तामिळनाडूचे राज्यपाल रण रवी यांनी चेन्नईच्या कोट्टूरपुरम येथील वरसिद्धी विनायक मंदिराला दिली भेट

Ganesh Chaturthi 2024 Festival Updates in Marathi: आज गणेश चतुर्थी आहे. आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घराघरात आगमन होणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रमुख घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Ganesh Chaturthi 2024:
Ganesh Chaturthi 2024:Sakal
Updated on

तामिळनाडूचे राज्यपाल रण रवी यांनी चेन्नईच्या कोट्टूरपुरम येथील वरसिद्धी विनायक मंदिराला दिली भेट

तामिळनाडूचे राज्यपाल रण रवी यांनी चेन्नईच्या कोट्टूरपुरम येथील वरसिद्धी विनायक मंदिराला भेट दिली आहे.

अंबानी कुटुंबाच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना

अभिनेता गोविंदा यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते तसेच अभिनेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्या जुहू येथील निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाप्पा घरी आणून स्थापना केली. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली. अभिनेता गोविंदा यांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले आहे.

नितीन गडकरींच्या नातवंडांनी केली गणेशासाठी आकर्षक साजवट

नितीन गडकरी यांची नातवंडं नंदिनी, निनाद, सानवी, अर्जून आणि कावेरी यांनी सोसायटीत बाप्पाची स्थापना केली. यामध्ये त्यांनी आपल्या कल्पकतेनं विज्ञानाचं महत्त्व दाखवून देणारी सजावट केली. यासाठी त्यांचे गडकरी आबांनी विशेष कौतुक केले.

इशा देओलच्या घरी झालं बाप्पाचं आगमन; खूपच चांगलं वाटत असल्याच्या व्यक्त केल्या भावना

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: कैलाश खेर यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची केली पूजा 

गायक आणि संगीतकार कैलाश खेर यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पूजा केली

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: छगन भुजबळ यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2024Sakal

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी चांद्रयान 3 च्या थीमवर आधारित गणपतीची सजावट

गणेशचतुर्थी 2024 निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कुटुंबीयांसह नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी पूजा करत आहेत. चांद्रयान 3 च्या थीमवर आधारित गणपतीची सजावट केली आहे.

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: गणेश चतुर्थीनिमित्त तुषार कपूरने कृष्णा बंगला येथे गणपतीची आरती केली

गणेश चतुर्थीनिमित्त तुषार कपूरने कृष्णा बंगला येथे गणपतीची आरती केली

Chaturthi 2024 LIVE Updates: अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील घरी बप्पा विराजमान

अभिनेता सोनू सूद याने गणेश चतुर्थीला मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबासह गणपतीची आरती केली.

Lalbaugcha Raja Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates: उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी लालबाग राजाची केली पूजा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त लालबागचा राजा येथे पूजा केली.

Ganesh Chaturthi LIVE Updates: अमेरिकेतील मेरीलँड राज्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत

अमेरिकेतील मेरीलँड राज्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत. ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल येथे श्री गजाननाची स्थापना ,आवर्तन या ढोल ताशा पथकाने वाजत गाजत काढली मिरवणूक

Dagdusheth Ganpati Ganesh Chaturthi LIVE Updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सुरु

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू (हुमनाबाद, कर्नाटक) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Raksha Khadse Ganesh Chaturthi LIVE: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाप्पांचं आगमन

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाप्पांचं आगमन होत आहे. मंत्री झाल्याच्या नंतर रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच बाप्पांच आगमन झालंय. रक्षा खडसे यांचे पुत्र गुरुनाथ आणि कन्या क्रशिका यांच्या हस्ते पूजा झाली.

murlidhar mohol Ganesh Chaturthi pune LIVE: पुण्यातील निवासस्थानी मुरलीधर मोहोळ यांच्या बाप्पाचे आज झाले आगमन

पुण्यातील निवासस्थानी मुरलीधर मोहोळ यांच्या बाप्पाचे आज आगमन झाले. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद हा प्रवास अतिशय समाधानकारक आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यातील निवासस्थानी मोहोळ यांच्या बाप्पाचे आज आगमन झाले आणि त्यानंतर कुटुंबीयांसमवेत त्यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Uddhav Thackeray lalbaugcha raja LIVE : उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे.

Tambdi Jogeshwari Mandir LIVE Updates: तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. केळकर रस्त्यावरील मंदार लॉड्ज चौकातून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत पारंपरिक नगारा वादन, ढोल पथक आणि केशव शंख पथक सहभागी झाले आहे दुपारी १२:३० वाजता अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापणा होणार आहे. यावर्षी स्वानंद निवास गणेश प्रसादात प्राण प्रतिष्ठा होणार आहे.

rupali chakankar Ganesh Chaturthi Live: महिला आयोगाचा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरी ही बाप्पाचं आगमन

महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या घरी ही बाप्पाचं आगमन झाला आहे. त्यांनी कुटुंबासमवेत बाप्पाची विधिवत पूजा केली.

Lalbaugcha Raja Rahul Narwekar LIVE: राहुल नार्वेकर यांनी घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन

भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज लालबागच्या राज्याचे दर्शन घेतले आहे. अनेक सेलिब्रेटी आणि राजकीय नेते लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येताना दिसत आहेत.

Ganesh Chaturthi eknath shinde aarti: 'वर्षा'वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाप्पाची आरती

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर शिंदेंनी गणरायाची आरती केली.

Ganesh Chaturthi Delhi LIVE Updates: राजधानी दिल्लीत देखील गणेश उत्सवाची धूम

राजधानी दिल्लीत देखील गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रशासनामार्फत गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात श्री गणेशाची स्थापना होणार आहे. स्थापनेपूर्वी बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलीये. मिरवणुकीत मराठी भाषिक भाविक सहभागी झालेत.

Raj Thackeray Home Ganpati Live: राज ठाकरे यांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहेत. मोठ्या उत्सहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

kesari wada ganpati LIVE Updates: मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती स्वागत मिरवणुकीला सुरुवात

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशा पथकांचे वादन सुरू झाले आहे. पुण्यातील रमणबाग चौकात केसरीवाडा गणपती ची मिरवणूक काढण्यात येत आहे. पारंपरिक पालखीमध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत.

Nashik Sangamner Live: नाशिक - संगमनेर मार्गावर टोल नाक्यावर बसेस अडवल्या, प्रवाशांचे हाल

गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या एसटी बसेस परतत असताना टोल नाक्यांवर अडवल्या जात आहेत. राज्य शासनाने या बसेसला टोलमधून सवलत दिलेली आहे. तरीदेखील बसेस अडवल्या जात असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. नाशिक - संगमनेर मार्गावर अडवण्यात आलेल्या बसेस व त्रस्त झालेले प्रवासी दिसत आहेत.

kasaba Ganpati LIVE : कसबा गणपती मानाचा पहिला गणपती, मिरवणुकीला सुरुवात

पुण्यात मनाचा पहिला गणपती ग्रामदैवत कसबा गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. रास्ता पेठेतून गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली आहे. मिरवणुकीत सनई चौघडा, बँड पथक, ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. मिरवणुकीनंतर अष्टविनायकापैकी एक श्री सिद्धटेक देवस्थानांच्या प्रतिकात्मक मंदिरात बाप्पा विराजमान होतील. ११:४५ वाजता कोल्हापूर येतील श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती आणि विश्वस्थ अदृश्य कांड सिद्धरश्वर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.

Ganesh Chaturthi eknath shinde live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पा झाले विराजमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी वर्षावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी देखील बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. राज्यातील बळीराजाच विघ्न दूर व्हाव, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रार्थना केली जाते.

dagdusheth ganpati Live LIVE Updates: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे लाईव्ह प्रसारण पाहा

शनिवार दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2024 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2024 चे प्रकाशन करण्यात येईल.

सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल. लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी शनिवार दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत 24 तास चालु राहिल.

लालबागचा राजा 2024 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वेबसाईट या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:

https://youtube.com/live/yHXkf0cygm8?feature=share

फेसबुक पेज:

https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:

https://instagram.com/lalbaugcharaja

dagdusheth ganpati Live: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर ढोल वादन सुरू

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर ढोल वादन सुरू झाले आहे. गांधाक्ष ढोल पथकाकडून वादन सुरू आहे. मंदिर परिसरात ढोल ताशांचा निनाद गुंजत आहे. काहीच वेळात मूर्ती मूळ मंदिरातून स्वागत मिरवणुकीसाठी बाहेर काढली जाणार आहे.

lalbaugcha raja LIVE Updates: लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी

जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे. तसेच लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान झाला आहे.आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आला आहे.

dagdusheth ganpati Pune Live: सिंह रथातून निघणार दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक

सिंह रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक निघणार आहे. सिंह रथाला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. भव्य अशा सिंह रथावर विविध रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.

सकाळी ८ वाजता मूळ मंदिरातून मूर्ती बाहेर काढली जाणार आहे. त्यानंतर सिंह रथातून बाप्पाची स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. जटोली शिव मंदिरात दगडूशेठ बाप्पा विराजमान होणार आहेत.

Ganesh Chaturthi News Live: गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाचा गणेशोत्सव असणार ११ दिवसांचा

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव ११ दिवसांचा असणार आहे. यंदा गणेश चतुर्थी आज म्हणजे ७ सप्टेंबर रोजी तर अनंतचतुर्दशी १७ सप्टेंबरला आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यासाठी अतिरिक्त एक दिवस मिळणार आहे.

आज शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पहाटे ४.५० पासून ते दुपारी १.५१ पर्यंत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतर देखील करता येऊ शकते.शहरातील सर्वच गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण झाली आहे.

mumbaicha raja unveiled Live: मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न

मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली आहे. सहा वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. मंडळाचे यंदाचं ९७ वे वर्ष आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.

Ganesh Chaturthi chinchpokli chintamani Live: चिंचपोकळीचा चिंतामणीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात, पाहा व्हिडिओ

चिंचपोकळीचा चिंतामणीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ तुम्ही याठिकाणी पाहू शकता.

Shri Siddhivinayak Temple aarti Live: श्री सिद्धिविनायकाची आज सकाळी करण्यात आली आरती

मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची आज सकाळी आरती करण्यात आली आहे. आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आज घराघरात गणेशाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आज गणपतीचे घराघरात आगमन होत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.