राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. यादरम्यान जालना जिल्ह्यातून एक खास बातमी समोर आली आहे. येथे गणेश भक्तांनी आरती झाल्यानंतर चक्क संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. दरम्यान या अनोख्या उपक्रमाबद्दल आयोजकांनी माहिती देताना सांगितेल की याचा उद्देश लोकशाही मुल्यांना चालना देणे आणि लोकांमध्ये त्यांच्या मूलभूत अधिकारांबद्दल जागरूकता आणणे हा आहे.