शेतकरी कुटुंबात जन्मलेला युवक व्हिएतनाममध्ये देतोय योगाचे धडे; महाराष्ट्राच्या गणेशची सातासमुद्रापार भरारी

योग विद्या खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीमधील असली तरी ही कला जेवढी भारतात जोपासली जात नाही. त्यापेक्षा अधिक जगभर जोपासली जाते.
Ganesh Khatal yoga training in Vietnam
Ganesh Khatal yoga training in Vietnamesakal
Updated on
Summary

वेटलॉस, मानसिक संतुलन, लठ्ठपणा, इतर बऱ्याच आजारांवर योग अधिकाधिक उपयुक्त ठरत असल्याने योग विद्येचे जगभर आकर्षण आहे.

कोरेगाव : भाडळे (ता. कोरेगाव) खोऱ्यातील एका सर्वसामान्य शेतकरी (Farmer) कुटुंबात जन्मलेला युवक मूळ भारतीय योग विद्येचा सातासमुद्रापार प्रचार, प्रसार करत आहे. गणेश गोपीनाथ खताळ असे त्याचे नाव असून, तो आग्नेय आशियातील व्हिएतनाममध्ये (Vietnam) योग (Yoga) प्रशिक्षक म्हणून यशस्वी सेवा करतो आहे. तिथे नुकताच त्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या हिवरे (ता. कोरेगाव) प्राथमिक शाळेत गणेशचे प्राथमिक, पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता माध्यमिक आश्रमशाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर शिक्षण येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात झाले. हिवरेत शालेय शिक्षण घेताना गणेश अगदी ओबडधोबड पद्धतीने योगा करू लागला होता. हळूहळू त्यामध्ये त्याची आवड वाढली; पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण काही मिळत नव्हते.

Ganesh Khatal yoga training in Vietnam
ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीची 'धर्मशाळा' मोजतेय अखेरची घटका; इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचा धोका!

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर गणेशला माध्यमिक शिक्षणासाठी पाडेगाव येथे आश्रमशाळेत घालण्यात आले. मात्र, तेथे त्याच्या योग विद्येला खऱ्या अर्थाने चालना, स्फूर्ती मिळाली. शाळेतील शिक्षक मुकेश वाघमारे यांनी गणेशची योग आवड लक्षात घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याला शास्त्रशुद्ध योग प्रशिक्षण द्यायला सुरवात केली आणि गणेश त्यात हळूहळू प्रवीण होऊ लागला. तालुका, जिल्हा, विभागीय स्पर्धांत यश मिळवू लागला. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गणेश हा येथील डी. पी. भोसले कॉलेजात (D. P. Bhosale College) दाखल झाला व त्याला योग विद्येसाठी भव्य असे अवकाश प्राप्त झाले.

अकरावी, बारावीपर्यंत त्याने प्रा. अरुण पाटील व बीकॉम भाग एक ते तीन, पुढे एमकॉम पूर्ण होईतोवर प्रा. कॅप्टन बाळकृष्ण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशने योग विद्येत अधिकाधिक प्रावीण्य मिळवले. झोनल, इंटरझोनल योग स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश मिळवत शिवाजी विद्यापीठ संघात आपले स्थान निश्चित केले. राष्ट्रीय स्पर्धांत गणेशने शिवाजी विद्यापीठ संघाचे सलग चार वर्षे प्रतिनिधित्व करत विद्यापीठाला अनेक पदके मिळवून दिली. त्यात हरियानात दोन वेळ, केरळमध्ये एक वेळ झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांत गणेशने शिवाजी विद्यापीठाला सुवर्णसह अनेक पदके मिळवून दिली.

Ganesh Khatal yoga training in Vietnam
मोठी बातमी! शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? 'महाविकास आघाडी'कडून तिकीट मिळण्याची शक्यता

एमकॉम झाल्यानंतर गणेशने योग प्रशिक्षण देण्यात करिअर करण्याचा निर्णय घेत ऑनलाइन माहिती घेऊन त्याने म्हैसूर येथे इंटरनॅशनल योगा टीचर (टीटीसी) हा महिन्याचा कोर्स यशस्वी पूर्ण केला. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च होता. खूपच आर्थिक चणचण असताना कुटुंबीयांनी हा खर्च केला अन् कोर्स पूर्ण होताच कॅम्पस इंटरव्हीवूमधून गणेशची व्हियेतनाममधील ‘शिवम योगा’ या योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत योग प्रशिक्षकपदी निवड झाली. गेली पाच वर्षे तो तेथे योग विद्येचे धडे देत असून, त्याला भारतीय चलनानुसार मासिक सव्वालाख रुपये मानधन दिले जात आहे.

योग विद्या खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीमधील असली तरी ही कला जेवढी भारतात जोपासली जात नाही. त्यापेक्षा अधिक जगभर जोपासली जाते. या कलेचे जगाला खूप आकर्षण आहे. प्रशिक्षकाला अक्षरशः देव मानून डोक्यावर घेतले जाते, असे सांगून, गणेश म्हणाला, ‘‘जगभर फिटनेस, हेल्दी जीवनशैलीला महत्त्व दिले जाते. प्रामुख्याने वेटलॉस, मानसिक संतुलन, लठ्ठपणा, इतर बऱ्याच आजारांवर योग अधिकाधिक उपयुक्त ठरत असल्याने योग विद्येचे जगभर आकर्षण आहे. त्या प्रमाणात भारतीयांत या कलेचे आकर्षण दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. आपले आपल्याला महत्त्व नसते, असा हा प्रकार आहे.’’

Ganesh Khatal yoga training in Vietnam
Navra Navri Sulka : नाशिकच्या पहिने नवरा-नवरी सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला तिरंगा ध्वज

व्हियेतनाममध्ये अजून काही वर्षे योग टीचर म्हणून नोकरी करून आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्यावर भारतात कायम स्थायिक होऊन सातारा, कऱ्हाड, पुण्यासारख्या शहरांत ‘योगा स्टुडिओ’ सुरू करण्याचा विचार आहे.

-गणेश खताळ, मूळ हिवरे, हल्ली व्हियेतनाम

Ganesh Khatal yoga training in Vietnam
Loksabha Elections : 'या' चार लोकसभा मतदारसंघांत आमचाच विजय होणार; जयंत पाटलांचा मोठा दावा

योगासनांची नावे... फायदे

  • शवासन, बद्ध पद्मासन, सिद्धासन..... हृदयरोग

  • सर्वांगासन, शवासन..... निद्रानाश

  • धनुरासन, पश्चिमोत्तासन, सुप्तवज्रासन, मत्स्यासन.....स्त्रियांच्या मासिक पाळीसंबंधीच्या तक्रारी

  • लोलासन, कुक्कुटासन, उत्तमांगासन, बाकासन, तोलासन..... अतिनिद्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.