महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला होता.
Ganesh Visarjan 2022 : दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलीय. पुणे (Pune), मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. मात्र, जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) गणपती विसर्जनाला गालबोट लागलंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या घरावर दगडफेक केलीय.
जळगाव जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2022) मिरवणूक शांततेत पार पडली असतानाच शहरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार घडलाय. यामुळं या भागात मोठा तणाव पाहायला मिळाला. जळगाव शहरात मेहरून परिसरात महापौर जयश्री महाजन यांचं निवासस्थान आहे, याच परिसरात स्थापन करण्यात आलेल्या एका गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकल्याच त्यांच्या परिवारात लक्षात येताच परिवारातील महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला होता.
याच वेळी काही संतप्त कार्यकर्त्यांकडून महापौर महाजन यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आणि घरावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जयश्री महाजन यांनी केलाय. या घटनेत पोलीस प्रशासनानं बंदोबस्ताकडं दुर्लक्ष केल्यानं हा हल्ला झाला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलिस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरूय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.