Ganeshotsav 2020 : राज्यात गणरायाचे उत्साहात स्वागत, वाचा दिवसभर काय घडलं

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
Updated on

उध्दव ठाकरेंनी घेतलं 'लालबाग'च्या राजाचं दर्शन

आज घरोघरी गणरायाचे आगमन झाले, यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह लालबागचा राजा गणपती तसेच गणेश गल्ली येथील मुंबईचा राजाचे दर्शन घेतले.

विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये 'पोलीस बाप्पा'चे स्वागत

गणेशोत्सवासाठी मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये 'पोलीस बाप्पा'चे स्वागत करण्यात आले. या गणपतीची संकल्पना ही गुन्हेगारी, वाहतूक नियम आणि विशेषत: सायबर फसवणूक याविषयी जनजागृती करणे अशी आहे.

 पुण्यातील ९ मंडळांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक

पुण्यातील धनकवडी भागात असणाऱ्या ९ गणेश मंडळांनी गणेश चतुर्थी निमित्त आज लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकाच ट्रॅक्टर ट्रॉली वर तब्बल ८ मंडळांनी त्यांच्या गणपतीच्या मूर्ती बसवत वाजत गाजत मिरवणूक काढली.

केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाइव स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आखिल मोहन नगर मित्र मंडळ या सगळ्यांचा समावेश समाजासाठी आपण काही देणं लागतो एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले. तसेच गणेशोत्सवात होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते हे देखील लक्षात घेता या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी आपल्या घरी हाताने बनवलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या घरी सुद्धा गणेशाचे आगमन झाले आहे.

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे.

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

लालबागचा राजा राम मंदिरात विराजमान

लालबागचा राजा गणपतीची प्रतिष्ठापना पूर्ण झाली असून लालबाग येथे असलेल्या राजा राम मंदिरात बाप्पा विराजमान झाले आहेत. यानंतर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. बाप्पांची आरती सध्या सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

कोकणात गणपती उत्सव जोमात

गणपती उत्सवाचा आज पहिला दिवस असून कोकणात चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. गणपतींचे आगमन झाले असून प्राणप्रतिष्ठा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर कोकणातील मुंबईत असलेले सर्वजण आपापल्या गावी गोळा झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावोगावचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणपती पूजा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी या शुभमुहूर्तावर आमचा देश आणि राज्य प्रगतीपथावर जावो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. सर्वांना सुखसमृद्धी आणि आरोग्य लाभो अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

खासदार नवनीत राणा मोदक बनवण्यात व्यस्त

खासदार नवनीत राणा मोदक बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. त्या पहिल्यांदाच किचनमध्ये दिसल्या असून आपण आपली संस्कृती पाळली पाहिजे असं त्या म्हणाल्या.

शिवतीर्थावर राज ठाकरेंकडून गणपतीची प्रतिष्ठापना

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी विधिवत पूजेनंतर गणपतीची आरती करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर लालबाग राजाच्या चरणी

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

त्याचबरोबर कोल्हापुरात छत्रपती शाहू घराण्याच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे.

लालबागचा राजाच्या मंडपात भाविक आणि सुरक्षारक्षकांत बाचाबाची

लालबागचा राजा गणपतीच्या मंडपात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोल्हापुरात गणेशाचा उत्सव

कोल्हापुरात शाहुराजे छत्रपतींच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात ढोलताशांच्या गजरात गणपतींचे स्वागत केले जात आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक

पुण्यातील मानाचे गणपती

  • कसबा पेठ गणपती

  • तांबडी जोगेश्वरी गणपती

  • गुरूजी तालीम गणपती

  • तुळशीबाग गणपती

  • केसरीवाडा गणपती

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या असून ढोल ताशांच्या गजराने वातावरण सुरमय झालं आहे.

पुण्यातील कसबा पेठ गणपतीची मिरवणूक ढोल ताशाच्या जल्लोषात सुरू झाली आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून औरंगाबादमध्ये गणेशाची पूजा

औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून गणपतीची पूजा करण्यात आली असून त्यांच्या हस्ते आरती झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती सोबतचा फोटो शेअर केला असून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाची पूजा करत असतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

ढोलताशाचा गजर अन् गणेशाचे जल्लोषात स्वागत

राज्यातील महत्त्वाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुका चालू आहेत. ढोलताशाच्या गजरात गणेशाचे स्वागत केले जात असून भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Ganeshotsav 2022 Live updates lalbaugcha raja ashtavinayak ganpati darshan
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना महंत महेश गिरी यांच्या हस्ते होत असून गणेशभक्तांकडून गणेशा ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणपतीची आरती पार पडली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. असं म्हणत यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गणेशाचे आगमन आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो. त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी सामाजिक भान राखणे गरजेचं आहे. राज्यातील गणेश मंडळाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे अवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अजित पवार यांच्याकडून गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेची वाटचाल श्रीगणरायांच्या कृपाशिर्वादानं अधिक गतिमान होवो असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंदाच्या, उत्साहाच्या, भक्तीमय वातावरणात, शिस्त व नियमांचं पालन करुन साजरा करुया असं अवाहनही अजित पवारांनी केलं आहे.

कर्नाटकामध्ये हुबळीतील इदगाह मैदानात होणार गणेशोत्सव

हुबली येथील इदगाह मैदानावरील गणेशपुजेला कर्नाटक हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या प्रकरणाची रात्री उशीरा सुनावणी झाली.

दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळची आरती पार पडली आहे.

जगभरातील गणेशोत्सवाच्या लाईव्ह अपडेट्स

आज गणेश चतुर्थी. गणेशोत्सवाचा पहिला दिवस. आज देशभर आणि जगभर गणपतीची प्रतिष्ठापणा होणार असून राज्यातील काही मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा झाली आहे. दिवसभरातील मानाच्या गणपतीचे दर्शन आपण 'सकाळ'च्या माध्यमातून घरबसल्या घेऊ शकता. देशभरातील आणि जगभरातील गणेशोत्सवाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.

सिद्धिविनायकाची आरती

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीची सकाळची आरती पार पडत आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घ्या आता थेट लाईव्ह, तेही घरबसल्या

लालबागचा राजा गणपतीची प्रतिष्ठापणा झाली असून आपण त्याचे घरबसल्या दर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()