Ganga Bhagirathi : "उद्या केशवपनही करायला लावतील"; 'गंगा-भागिरथी'वरुन रान पेटलं, शिंदे सरकारविरोधात संताप

या प्रस्तावावरुन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका होत आहे.
Widow Woman
Widow WomanSakal
Updated on

विधवा महिलांना आता गंगा भागिरथी असं संबोधलं जावं, असा प्रस्ताव राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी पाठवला आहे. या प्रस्तावावरुन आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी अशा संबोधनाला विरोध दर्शवला असून सरकारवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे या प्रस्तावात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं.भा.) हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.

Widow Woman
Sanjay Raut :"मला जेलमध्ये जायचं नाहीये, युती तोडा असं एकनाथ शिंदे म्हणाले"

सोशल मीडियावरुन तीव्र विरोध

विधवा नव्हे तर गंगा भागिरथी, तर मग विधुर पुरुषांना काय म्हणायचं, असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींना ही मनुस्मृती पुन्हा आणण्याची सुरुवात आहे, असं वाटत आहे.

काही जणांनी आपण १०० वर्षे मागे जात आहोत, उद्या केशवपनही करायला लावतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील विधवा महिलांना काय म्हणायचं, असं प्रश्नही नेटकऱ्यांना पडल्याचं प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.