Ajit Pawar: बैलासमोर नाचल्याच्या व्हिडिओवर अजित पवार म्हणतात, "गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…"

बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटील नाचत असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
gautami patil on ajit pawar
gautami patil on ajit pawaresakal
Updated on

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच असते. गौतमी शिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. गौतमी तिच्या अदामुळे खूप चर्चेत असते. अशातच आता गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल हॉट आहे. मुळशीत गौतमी चक्क बैलासमोर नाचली आहे. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतमीच्या या व्हिडिओबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे.

gautami patil on ajit pawar
Jitendra Awhad: “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी…”, लव्ह जिहादच्या बॅनरवरून आव्हाडांची प्रतिक्रिया

‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवार म्हणाले की “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

gautami patil on ajit pawar
राज्यात 2287 बालविवाह रोखले; 10वी-12वीच्या परीक्षेनंतर सर्वाधिक विवाह, 9 जिल्हे आघाडीवर

पुढे अजित पवार म्हणाले की, “बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी पुढं सांगितलं आहे.

gautami patil on ajit pawar
४ वर्षांनी उजनी जाणार ४० टक्क्यापर्यंत मायनस; धरणाने तळ गाठला, सोलापूरसाठी ५ मेला पाणी सुटणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()