Solar Energy : राज्यात लाख ग्राहकांकडून छतावरील सौरऊर्जा निर्मिती

Broken Solar Panel
Broken Solar Panelesakal
Updated on

Solar Energy : छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

छतावरील सौरऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज वापरल्याने संबंधित ग्राहकाचे वीजबिल कमी होते. (Generation of rooftop solar power by lakh consumers in state news)

गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली ती नेट मीटरिंगद्वारे ‘महावितरण’ला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी-कधी शून्य वीजबिलही येते.

राज्यात ६ सप्टेंबरला रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एक लाख चार हजार ३५ झाली आहे. एकूण वीजनिर्मिती क्षमता एक हजार ६५६ मेगावॉट इतकी झाली. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे.

राज्यात २०१६- १७ या आर्थिक वर्षात केवळ एक हजार ७४ ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते. त्यांची एकूण क्षमता २० मेगावॉट होती. त्यानंतर महावितरणच्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Broken Solar Panel
Solar Energy : लोहमार्गावरील सौर पॅनेलमधून वीज निर्मिती; स्वीत्झर्लंडमधील स्टार्टअपचा अनोखा प्रयोग; विशेष रेल्वेची घेणार मदत

२०१९- २० या आर्थिक वर्षात अशा ग्राहकांची संख्या २६ हजार १७ झाली असून, क्षमता ५१२ मेगावॉटवर पोहोचली आहे. दोनच वर्षांत २०२१-२२ या आर्थिक वर्षात या ग्राहकांची संख्या ५५ हजार ७९८ झाली असून, वीजनिर्मिती क्षमता एक हजार १७ मेगावॉट झाली. २०२१-२२ या एका आर्थिक वर्षात रूफ टॉप सोलरद्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती क्षमतेत ४२१ मेगावॉटची भर पडली.

रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. महावितरण ग्राहकांना हे प्रकल्प बसविण्यासाठी मदत करते.

हे लक्षात घ्या...

महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाइटवर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला तीन किलोवॉटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते.

तीन किलोवॉट ते दहा किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॉटनंतर प्रत्येक किलोवॉटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते. वैयक्तिक वीज ग्राहकांबरोबरच हाउसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते.

Broken Solar Panel
Maharashtra News : राज्यात 789 जातीचे पतंग; पश्‍चिम घाटात 91 ‘स्पेसीस’चा शोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()