1 रुपयात उतरवा पीकविमा अन्‌ मिळवा 20,000 ते 81,000 भरपाई! विमा भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांना भरता येईल ‘या’ संकेतस्थळावरून अर्ज

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पीकविमा भरण्यास बुधवार (ता. १९) पासून सुरुवात झाली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना पिकांचा विमा एका रुपयात भरता येणार आहे.
PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
PM Fasal Bima Yojanasakal
Updated on

सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पीकविमा भरण्यास बुधवार (ता. १९) पासून सुरुवात झाली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना पिकांचा विमा एका रुपयात भरता येणार आहे.

सरकारने खरीप पीकविम्यासाठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भईमूग, तीळ, कारळे व कांदा ही १४ पिके समाविष्ट केली आहेत. या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केले आहे. पीकविमा योजनेत समाविष्ट पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. कुळाने अथवा भाड्याने शेती करणाऱ्यांसह सर्व शेतकरी यात भाग घेऊ शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी ॲपवर करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या म्हणजेच शासकीय, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर व प्रार्थनास्थळांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. या योजनेत ज्या पिकाची पेरणी अथवा लागवड केली आहे, त्याचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक शेतात नसल्यास विमा नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे.

रिमोट सेसिंगद्वारे उत्पादन निश्चिती

यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांचे महसूल मंडलातील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याद्वारे येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन मंडलाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अन्‌ संकेतस्थळ

सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोणात्र गरजेचे. आधार क्रमांक, पीकविम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा, बँक खाते आधार संलग्न असावे, कारण नुकसान भरपाई केंद्र सरकारच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यातच होईल. आधार कार्डवरील नाव व बँक खात्यातील नाव सारखे असावे, विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने सीएससी विभागास ४० रुपये मानधन निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीएससी चालकांना प्रतिअर्ज एक रुपया द्यावा. प्राधिकृत बँकेत, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या मदतीने अथवा www.pmfby.gov.in या पोर्टलवर पीकविमा भरता येईल.

विमा संरक्षणाच्या बाबी अशा...

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणीपश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (हेक्टरी)

  • पीक विमा संरक्षित रक्कम

  • भात ४०००० ते ५१७६०

  • ज्वारी २०००० ते ३२५००

  • बाजरी १८००० ते ३३९१३

  • नाचणी १३७५० ते २००००

  • मका ६००० ते ३५५९८

  • तूर २५००० ते ३६८०२

  • मूग २०००० ते २५८१७

  • उडीद २०००० ते २६०२५

  • भुईमूग २९००० ते ४२९७१

  • सोयाबीन ३१२५० ते ५७२६७

  • तीळ २२००० ते २५०००

  • कारळे १३७५०

  • कापूस २३००० ते ५९९८३

  • कांदा ४६००० ते ८१४२२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.