Latest Maharashtra News: श्रीगोंदे, ता. २१ ः तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात, म्हणजे तुमच्या मनात काहीतरी शंका दिसते. मनात कोणतीही शंका, गैरसमज बाळगू नका. श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडेच राहावी, हा आमचा आग्रह कायम आहे.
तुम्ही कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील कार्यकर्त्यांना दिले. माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज (ता.२१) बारामती (जि. पुणे) येथे पवार यांची भेट घेतली.
पवार म्हणाले, की तीन पक्षांच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यातील आठ जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये श्रीगोंद्याची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला असला,