Maharashtra News : राज्याला तीन मोठ्या प्रकल्पांची भेट! एक लाख सतरा हजार कोटींची गुंतवणूक होणार
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली, त्यात प्रकल्पांचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार एवढ्या रोजगारांची निर्मिती होईल.
मुंबई - राज्याला आज तीन मोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे. विविध ठिकाणांवर १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रकल्पांना मान्यता दिली.