Girish Mahajan: गिरीश महाजनांचा विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्च भाषेत संवाद? ऑडिओ क्लीप व्हायरल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल...
Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

मुंबई : जिल्हा परिषदेतील भरतीबाबत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. या संवादादरम्यान, महाजन यांनी या विद्यार्थ्यांना अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. या क्लीपच्या सत्यतेची अद्याप पुष्टी झालेली नाही, पण यामुळं महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Girish Mahajan interaction with students in abusive language audio clip viral)

बुलढाणा येथील एका विद्यार्थ्यानं जिल्हा परिषदेच्या जागेसाठी लवकर परीक्षा घेण्याची मागणी गिरीश महाजन यांच्याकडे फोनवरुन संवाद साधताना केली. "ही परीक्षा होत नसल्यानं विद्यार्थी खूपच नैराश्यात गेले आहेत, त्यामुळं भरती संदर्भातील फाईलवर लवकर निर्णय घ्या," अशी विनंती ऑडिओ क्लीपमधील विद्यार्थ्यानं महाजन यांना केली.

Girish Mahajan
शिवसेनेच्या 'मशाली'सह कशी लढवली निवडणूक? भुजबळांकडून जुन्या आठवणींना उजाळा

यावर अर्वाच्च भाषेत बोलत गिरीश महाजन म्हणतात, "कामं नाही का रे तुम्हाला काही सणासुदीचं. दिवसभरातून ५०० फोन लावता. काही करत नाही मी, रद्द झाली ती परीक्षा. रद्द केली. फोन ठेव"

Girish Mahajan
Chhagan Bhujbal: आपल्या गडगंज संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

दरम्यान, राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तब्बल १३ हजार जागांसाठी भरती न झाल्याने विद्यार्थी हवालदिलं झाले आहेत. या जागांसाठी सन २०१९ नंतर एकदाही भरती न झाल्यानं २० लाख अर्ज प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ही परीक्षा होऊन भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()