राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. यादरम्यान राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र यादरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे तरुणांनी प्रश्न विचारायला सुरूवात केल्यानंतर महजनांना पळ काढावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी महाजन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.