सोलापूरच्या नामांकित महाविद्यालयात मुलीचा विनयभंग! 15 दिवसांनी पीडितेची जेलरोड पोलिसांत धाव; पोलिसांनी मागितले फुटेज, CCTV कॅमेरा नसल्याचे कॉलेजचे उत्तर

वर्गात गोंधळ सुरू असताना पीडितेने मागे वळून पाहिले. त्यावेळी वर्गातील एकाने बोटाने इशारा करून ‘पुढे बघ’ अशी धमकी दिली. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी व २१ ऑगस्टला सकाळी त्या मुलाने मनात लज्जा निर्माण होईल, असे भाष्य व हावभाव केले. घाबरलेल्या पीडितीने २३ ऑगस्ट रोजी जेलरोड पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली.
sakal breaking news solapur mahapalika
sakal breaking news solapur mahapalikasaka
Updated on

सोलापूर : वर्गात गोंधळ सुरू असताना पीडितेने मागे वळून पाहिले. त्यावेळी वर्गातील एकाने बोटाने इशारा करून ‘पुढे बघ’ अशी धमकी दिली. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास व २१ ऑगस्टला सकाळी पावणेबाराच्या सुमारास वॉशरूमला जात असताना त्या मुलाने मनात लज्जा निर्माण होईल, असे भाष्य व हावभाव केले. घाबरलेल्या पीडितीने २३ ऑगस्ट रोजी जेलरोड पोलिसांत धाव घेऊन हकिकत सांगितली. त्यावरून त्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला बाल समितीपुढे हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने नवीन निर्णय काढून शाळा-महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा- महाविद्यालयांच्या वर्गांसह परिसरात कॅमेरे अपेक्षित आहेत. मात्र, अद्याप सोलापूर शहर- जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये व परिसरात सीसीटीव्ही लावल्याचे दिसत नाही.

जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलीला त्याच शाळेतील एक मुलगा १५ दिवसांपासून त्रास देत होता. त्याची माहिती कोणालाच झाली नाही, शेवटी तिच्या भावाने महाविद्यालयात येऊन संबंधित मुलाला जाब विचारल्यावर हा प्रकार समोर आला. पीडितेने पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल समितीपुढे हजर केले. दरम्यान, आता जेलरोड पोलिसांनीही त्या महाविद्यालयास पत्र पाठवून मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत.

पोलिसांनी मागितले फुटेज, कॅमेरा नसल्याचे कॉलेजचे उत्तर

पीडितेने पोलिसांत फिर्याद दिल्यावर जेलरोड पोलिसांनी संबंधित महाविद्यालयास पत्रव्यवहार करून घटना ज्याठिकाणी घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी केली. त्यावेळी महाविद्यालयाने त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उत्तर पोलिसांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे यांनी महाविद्यालयाने काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीचे पत्र प्राचार्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.