दहावीत मुलीच हुश्शार! 'मराठी'चा 97.01 टक्के तर इंग्रजीचा निकाल 98.37 टक्के; सोलापूर जिल्ह्याचा निकाल 95.25 टक्के; मंगळवेढा, मोहोळ, सांगोल्याचाही निकाल सर्वाधिक

इयत्ता दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच हुश्शार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील प्रवेशीत ६६,२३८ विद्यार्थ्यांपैकी ६५,६७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६२,५५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९५.२५ टक्के लागला आहे.
solapur
10th Exam Resultesakal
Updated on

सोलापूर : इयत्ता दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच हुश्शार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील प्रवेशीत ६६ हजार २३८ विद्यार्थ्यांपैकी ६५ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६२ हजार ५५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९५.२५ टक्के लागला आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९६.९५ तर मुलांची टक्केवारी ९३.८० टक्के आहे.

इयत्ता बारावीच्या निकालानंतर बोर्डाने इयत्ता दहावीचा देखील निकाल मे महिन्यातच जाहीर केला आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होत असल्याने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० हजारांहून अधिक आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना मराठीत कमी गुण पडले, पण इंग्रजीला त्याहून जास्त गुण आहेत. सोलापूर शहरासह उत्तर व दक्षिण सोलापूरमधील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी ९३.२५ टक्के असून पंढरपूर तालुक्याचा निकाल ९४.१८ टक्के आहे. जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्याने दहावीच्या परीक्षेत बाजी मारली असून तालुक्याचा निकाल ९७.९८ लागला आहे. त्यानंतर मोहोळ (९७.२९ टक्के) आणि सांगोला तालुक्याचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे. याशिवाय अक्कलकोट, करमाळा, बार्शी व माढा या तालुक्यांचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असून माळशिरस तालुक्याचा एकूण निकाल ९६.२० टक्के लागला आहे. पंढरपूर तालुक्याचा निकाल ९४.१८ टक्के आहे.

ठळक बाबी...

  • - जिल्ह्यातील ३५ हजार ५१५ मुलांपैकी ३३ हजार ३१५ जण (९३.८० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

  • - सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार १५६ मुलींपैकी २९ हजार २३७ मुली उत्तीर्ण (९६.९५ टक्के) झाल्या आहेत.

  • - जिल्ह्यातील तीन हजार ११९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

  • - पुणे विभागात मराठी विषयाचा निकाल ९७.०१ टक्के तर इंग्रजीचा निकाल ९८.३७ टक्के लागला आहे.

तालुकानिहाय निकाल

  • तालुका मुली मुले निकालाची टक्केवारी

  • अक्कलकोट २१५२ १८८० ९५.१६

  • बार्शी २९५३ २३८९ ९५.८८

  • करमाळा १६९५ १४९७ ९५.४२

  • माढा २६६५ २१३६ ९५.८४

  • माळशिरस ३७२३ ३२२३ ९६.२०

  • मंगळवेढा १७८७ १५२७ ९७.९८

  • मोहोळ २१६२ १८६० ९७.२९

  • पंढरपूर ३७८६ ३३१८ ९४.१८

  • सोलापूर ९८३४ ९१६६ ९३.६५

  • सांगोला २५५८ २२४१ ९७.१०

  • एकूण ३३३१५ २९२३७ ९५.२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.