वसतिगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिमध्ये घडला आहे. याप्रकरणी, संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (girls staying in hostels were forced by teachers to dance in front of tourists at Nashik )
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी व छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. मुलींनीच पालकांकडे ही तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.(Latest Marathi News)
मुलींनी तक्रार करताच पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच, घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.(Latest Marathi News)
संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल आहे. तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जाते, असा आरोप वसतिगृहातील मुलींनी केला आहे.
नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुलींना घरी आणत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.(Latest Marathi News)
मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक व तेथील शिक्षिकांनी फेटाळून लावला आहे. आरोपांबाबत एका शिक्षिकेने सांगितले आहे की, आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना कदाचित पर्यटक ते पाहत असतील. असं स्पष्टीकरण शिक्षिकांनी दिलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.