‘ती दिसलीच नाही तर बदलण्यासाठी आणायची कोठून’? या सारख्या मीम्समधून दोन हजार रुपयांच्या नोट बदलाचे आदेश निघाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार कॉमेंट्स करत नोटबंदीच्या निर्णयाची चांगलीच खिल्ली उडविली आहे.
भारतीय रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटा बदलण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार, नोट धारकांनी त्यांच्या नोटा बॅंक खात्यात ३० सप्टेंबर पर्यंत जमा करायच्या आहेत. एरवी समाज माध्यमामध्ये कोणताही सरकारी निर्णय आला की, त्याचे समर्थक व विरोधक यांच्यातील प्रतिक्रियांची गर्दी होते. पण यावेळी दोन हजाराच्या नोटबंदीवर नेटकऱ्यांनी समर्थन व विरोध सोडून या निर्णयाचीच खिल्ली उडविल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)
मुळातच दोन हजाराच्या नोटाच अत्यंत कमी प्रमाणात वापरामध्ये आहेत. एकूण उपलब्ध नोटांपैकी केवळ १०. ८ टक्के नोटा चलनात वापरल्या जात आहेत असे रिझर्व बॅंकेचे म्हणणे आहे. तेव्हा यावर एका मीम्समध्ये दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी, आणायच्या कुठून असा प्रश्न विचारला आहे.
‘ती होती पण ती दिसली नाही तर बदलण्याचा प्रश्न कुठे, असा प्रश्न विचारला आहे. ‘माणसाचे आगमन खाटावर माणसाचे मध्यंतर पाटावर माणसाचा शेवट घाटावर तरी पण चित्त सारे नोटावर’ या शब्दात नोटांच्या मुद्द्यावर मानवी वृत्तीचे दर्शन काहींनी मांडले.(Latest Marathi News)
‘नांदवायची नव्हती मग मला आणली कशाला, आपली दोन हजाराची नोट, या शब्दात नोटेचे मनोगत व्यक्त केले. ‘दोन हजाराची नोट बंद होणे म्हणजे रोल्स रॉयल्सचे मॉडेल बंद होण्यासारखे आहे’, ‘आपल्याला काही देण घेणे नाही कोणाकडे होती याची पण माहिती नाही’ या सारखे मीम्स धमाल उडवत आहेत. (Latest Marathi News)
एका नेटकऱ्याने सुंदर शब्दात वर्णन केले. ‘एक जुनी मैत्रीण होती, ती पूर्वी फार भेटायची, नंतर भेटी कमी झाल्या, आजकाल ती दिसत देखील नाही अशी ती दोन हजाराची नोट’ या शब्दात या नोटेचे वर्णन केले आहे. एकंदरीत, नेटकऱ्यांना दोन हजाराची नोट भलतीच आवडली आहे. नोट नाही असे म्हणताना सामान्य माणूस त्याचे कारण सिलिंडर कडे बोट दाखवतो हे व्यंगचित्र देखील व्हायरल झाले. एकदंरीत ही नोटबंदी तशी गर्दी, रांगा, गोंधळापासून दूर असल्याने त्याचा आनंद विनोदी पद्धतीने नेटकरी अधिक घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.