खासगी शाळांसाठी खुशखबर! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता अंतिम; पदभरतीसाठी आधारव्हॅलिड पटसंख्येची अट; कोणत्या पदासाठी किती पट जरूरी, वाचा भरतीचे निकष

आता त्या सुधारित आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३२,३७६ पदे मंजूर असून आता खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षेकतर कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांची भरती कधीपासून सुरू होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पदभरतीसाठी आधारव्हॅलिड पटसंख्येची अट आहे.
maharashtra private school
maharashtra private schoolsakal
Updated on

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या २८ जानेवारी २०१९च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधावरील न्यायालयातील स्थगिती फेब्रुवारी २०२४ मध्ये उठली आहे. पण, लोकसभा निवडणुकीमुळे भरती होऊ शकली नाही. आता त्या सुधारित आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३२ हजार ३७६ पदे मंजूर असून आता खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षेकतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पदभरतीसाठी आधारव्हॅलिड पटसंख्येची अट आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायकांची पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पटसंख्येची मर्यादा घालण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील ५०० पटसंख्येसाठी एक कनिष्ठ लिपिक तर ५०१ ते एक हजार पटसंख्येसाठी एक कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक, १००१ ते १६०० पटसंख्येसाठी दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक, १६०१ ते २२०० पटसंख्येसाठी दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक, २२०१ ते २८०० पटसंख्येसाठी तीन कनिष्ठ, एक वरिष्ठ व एक मुख्य लिपिक आणि २८०० पेक्षा पटसंख्येसाठी पुढील प्रत्येकी ६०० पटसंख्येसाठी एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक भरता येणार आहे.

इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या एक हजार एकपेक्षा जास्त असल्यास एक ग्रंथपाल तर इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गातील २०१ ते ७०० पटसंख्येसाठी एक प्रयोगशाळा सहायक आणि ७०१ ते १५०० पटसंख्येसाठी एक आणि त्याहून जास्त पटसंख्येसाठी एक अशी पदे भरता येणार आहेत.

उच्च माध्यमिक शास्त्र शाखेतील भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र विषयांसाठी दोन हजार ४० प्रयोगशाळा सहायक पदे भरली जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने संचमान्यता पूर्ण करण्यात आली असून याच आठवड्यात ती अंतिम होईल, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्थिती

  • एकूण मंजूर पदे

  • ३२,३७६

  • कनिष्ठ लिपिक

  • १७,६९५

  • वरिष्ठ लिपिक

  • ४,९१२

  • मुख्य लिपिक

  • ९२६

  • ग्रंथपाल

  • २,११८

  • प्रयोगशाळा सहायक

  • ६,७२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.