ST कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

ST Employee
ST Employee
Updated on

राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्माचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही सेवा आहे. तिजोरीची चावी अर्थमंत्र्यांकडे आहे. मात्र मी बोललो की ते नाही म्हणत नाहीत. आज एसटी महामंडळाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे.  महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत.

तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

ST Employee
Murder in London: स्वप्न राहिलं अधुरं! उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीला फ्लॅटमेटनं भोसकलं!

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जून ते सोन अस म्हटले जाते. एसटीची सेवा सुधारत चालली आहे. नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे विरोधी पक्षाला जरा भीती वाटत आहे, असे शिंदे म्हणाले.

ST Employee
Mumbai News : मुंबईत 400 हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला अटक, लोकांना देत होता 'जन्नत'चे आमिष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.