चिंचोळी MIDC कामगारांसाठी खुशखबर! सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनमुळे उभारले कामगार रुग्णालय; १२ तास ओपीडी

चिंचोळी एमआयडीसीत राज्य कामगार विमा सोसायटीतर्फे नवीन हॉस्पिटल सुरू झाले आहे. त्यासाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनने अनेक वर्ष पाठपुरावा केला होता. शनिवारी या दवाखान्याचे उद्‌घाटन ईएसआयसीचे नोंदणीकृत कामगार अतिश काळे, सुदर्शन बाळमाते यांच्या हस्ते झाले.
chincholi midc
chincholi midcsakal
Updated on

सोलापूर : चिंचोळी एमआयडीसीत राज्य कामगार विमा सोसायटीतर्फे आता नवीन हॉस्पिटल सुरू झाले आहे. त्यासाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. शनिवारी (ता. २४) या सेवा दवाखान्याचे उद्‌घाटन ईएसआयसीचे नोंदणीकृत कामगार अतिश काळे आणि सुदर्शन बाळमाते यांच्या हस्ते पार पडले.

चिंचोली एमआयडीसीतील उद्योगांमध्ये अंदाजे ३० ते ३५ हजार कामगार काम करतात. काम करताना अचानकपणे अपघात झाल्यानंतर त्यांना वेळेत उपचार मिळणे गरजेचे असते. ही गरज ओळखून सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुढाकारातून आता राज्य कामगार विमा रुग्णालयाय सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी नोंदणीकृत कामगारांवर मोफत प्राथमिक औषधोपचार होणार आहेत.

पुण्यातील वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बाळकृष्ण रंगदळ, सोलापूरच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आसावरी कुलकर्णी, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी, माजी अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे, उपाध्यक्ष गणेश सूत्रावे, सिद्धाराम चिट्टे, सचिव वासुदेव बंग, सहसचिव सप्रेम कोठारी, खजिनदार कमलेश शहा, कार्यकारी सदस्य शिवशंकर आंधळकर, तारासिंग राठोड यांच्यासह इतर उद्योजक व कामगारांच्या उपस्थितीत हा उद्‌घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे व्यवस्थापक विनायक दुदगी यांनी केले.

‘ओपीडी‘ची १२ तास सोय

चिंचोळी एमआयडीसीतील कामगार रुग्णालयातील ओपीडीसाठी पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी व स्टाफ देखील आहे. सकाळी ८ ते २ आणि दुपारी २ ते रात्री ८ असे एकूण १२ तास दवाखान्यातील ओपीडी सुरु राहणार आहे. उद्योगात काम करताना अपघात झाल्यानंतर सोलापूर शहरात येण्यासाठी वेळ जात होता. त्यामुळे या दवाखान्याचा मोठा आधार कामगारांसाठी असणार आहे.

यशस्वी पाठपुरावा अन्‌ कामगारांची झाली सोय

राज्य कामगार विमा रुग्णालयाने चिंचोळी एमआयडीसी परिसरात स्वतंत्र ओपीडी सुरु करावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले असून आता एमआयडीसीत ओपीडी सुरु झाली आहे. चिंचोली एमआयडीसीतील उद्योजकांनी कामगारांची नोंदणी या सेवा दवाखान्यात करावी. ‘ईएसआयसी’कडील नोंदणीकृत कामगारांवरही येथे उपचार होतील.

- राम रेड्डी, अध्यक्ष, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.