खुशखबर! मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’; प्रवासाचा वेळ एक तासाने कमी

सोलापूर-हैदराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’ झाली. यामुळे सोलापूर ते हैदराबादचा प्रवास एका तासाने कमी झाला आहे.
railway
railwaysakal
Updated on

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’ झाली असून, यामुळे सोलापूर ते हैदराबादचा प्रवास एका तासाने कमी झाला आहे.

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसच्या वेळपत्रकात आणि गाडी क्रमांकामध्ये बदल झाला असून, याची अंमलबजावणी आज (१ ऑक्टोबर) पासून होणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली. प्रवाशांसाठी आता ही खुशखबर असून या गाडीला प्रवाशांची मोठी गर्दी होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

‘मुंबई-हैदराबाद’चा बदलला क्रमांक

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचा आता सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाला आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबई- सोलापूर- हैदराबाद दरम्यान धावणारी गाडी आता ‘मुंबई- हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस’ या नावाने ओळखली जाईल. याशिवाय मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचा क्रमांकही बदलला आहे. प्रचलित असलेल्या १७०३१ आणि १७०३२ या क्रमांकाऐवजी २२७३१ आणि २२७३२ या नव्या क्रमांकाने ही गाडी धावणार आहे. या गाडीतून हैदराबादला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर आणि वेगवान होणार आहे.

‘मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस’चे नवीन वेळापत्रक

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. मुंबईहून हैदराबादसाठी निघणारी २२७३२ ही मुंबई-हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून दुपारी २.१० वाजता सुटेल. त्यानंतर ही गाडी दादर (२.२२), कल्याण (३.०२), लोणावळा (४.४३), पुणे (सायंकाळी ६.०५), उरळी (६.३८), केडगाव (६.५८), दौंड जंक्शन (७.२५), जेऊर (८.१८), कुर्डुवाडी जंक्शन (८.५३), सोलापूर (रात्री १०.१०), दुधनी (११.०३), कलबुरगी (११.५०), वाडी (१२.४०), चित्तूर (१२.५९), सेडम (विना थांबा), तांडूर (१.३९), विकाराबाद (२.१६), लिंगमपल्ली (२.५९) बेगमपेठ (३.२५) आणि हैदराबादला पहाटे (४.३०) वाजता पोचेल. तर हैदराबादहून मुंबईकडे निघणारी २२७३१ ही गाडी हैदराबाहून रात्री १०.३५ वाजता सुटेल. ही गाडी बेगमपेठ (१०.३९), लिंगमपल्ली (१०.५९), विकाराबाद (११.३९), तांडूर (रात्री १२.०९), सेडम (१२.४९), चित्तूर (१.२९), वाडी (२.१५), कलबुरगी (२.४५), दुधनी (३.३३), सोलापूर (पहाटे ०४.४०), कुर्डुवाडी (०५.४८), जेऊर (०६.१८), दौंड जंक्शन (०७.३०), केडगाव (०७.५८), उरळी (०८.२०), पुणे (सकाळी ०९.१०), लोणावळा (१०.२३), कल्याण (११.४७), दादर (१२.३२) आणि सीएसएमटी मुंबई (दुपारी ०१.०५ वाजता) स्थानकात पोचेल.

प्रवासी यांबे रद्द न करता पुर्ववत ठेवण्यात यावेत

रेल्वे प्रशासनाने हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस सुपरफास्ट केल्याबद्दल प्रवाशांना कमी वेळेमध्ये प्रवास सुखकर होणार आहे. पण, गाडीस सोलापूर विभागातील 'केम' रेल्वे स्टेशनचा थांबा रद्द केल्याने व्यापारी, विद्यार्थी, पासधारकांची गौरसोय होत आहे. तरी रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ करतेवेळी प्रवासी यांबे रद्द न करता पुर्ववत ठेवण्यात यावेत. केमचा थांबा रेल्वे प्रशासनाने पुर्ववत ठेवावा.

- संजय पाटील, अध्यक्ष प्रवासी सेवा संघ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.