"जनाब राऊत..तेव्हा हाताला काय लकवा मारतो काय?"

gopichand padalkar
gopichand padalkaresakal
Updated on

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर टिका करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (shivsena sanjay raut) यांच्यावर भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (bjp Gopichand Padalkar) यांनी निशाणा साधला आहे. पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी उस्मानाबादमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्यासहीत शिवसेनेवर (shivsena) टीका केलीय.

तेव्हा हाताला काय लकवा मारतो काय? - पडळकर

“जनाब राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात पण तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता.. तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते त्यावेळेसे ऐरवी उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?”, अशी टीका पडळकर यांनी केलीय.

gopichand padalkar
एका महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याची पवारांवर वेळ- चंद्रकांत पाटील

“तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. त्यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?,” असा प्रश्न पडळकरांनी विचारलाय. “तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय. असंच दिसतंय,” असंही पडळकर म्हणाले आहेत.

सामनाच्या अग्रलेखात भाजप नेत्यावर टीका

काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी शिवसेनेनं हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण देत म्हटलं आहे. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय.

gopichand padalkar
...तर तेंडुलकरच्या खात्यात एक लाख धावा असत्या : अख्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.