Gopichand Padlakar: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आरेवाडीत घनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलंय. यावेळीही त्यांनी शरद पवारांचा उल्लेख 'लबाड लांडगा' असा केलाय.
धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही, यासाठी शरद पवार जबाबदार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर त्यांनी आणखी आरोपही केले. मराठ्यांना पहिल्यांदा कोणी विरोध केला, तो म्हणजे शरद पवारांनी, असं वक्तव्यही पडळकरांनी केलं
सांगलीच्या आरेवाडीत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आरोप केला की, मराठ्यांना सर्वात आधी शरद पवार यांनी विरोध केला होता. बहूजनाचा बुरखा घालून बहूजनाला विरोध केला. यावेळी त्यांनी शालिनीताई पाटील यांचाही उल्लेख केला.
यावेळी ते म्हणाले की, "बहूजनाचा बूरखा पांघरलेला लांडगा हा बहूजनांच्या विरोधी किती आहे, हे आपल्याला माहिती आहे.. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी त्यावेळी आमदार असताना मांडली होती. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध या लबाड लांडग्याने केला."
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांचाही उल्लेख केला. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण शरद पवारांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, अस वक्तव्य पडळकरांनी केलं. (Latest Marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.