ओ, तुम्ही काय मंत्री आहात का? प्रश्न विचारताना पडळकर भडकले

gopichand padalkar
gopichand padalkarsakal media
Updated on
Summary

ओ, तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहात काय? तुम्ही काय सांगताय मला, अशा शब्दांत पडळकरांनी प्रश्न विचारण्यात अडथळा आणणाऱ्या आमदारांना दरडावले.

मुंबई - राज्यात हिवाळी अधिवेशन (Winter Session) आरोग्य भरतीसह विविध परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे तापण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळ्यावरून प्रश्न विचारले. यावेळी पडळकर प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिले असताना सुरुवातीला गोंधळ झाल्यानं भडकले होते. परीक्षा भरतीच्या घोटाळ्यावरप्रश्न विचारता पडळकर भडकल्याचं दिसून आलं. हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारत असताना पडळकरांना मधेच सत्ताधारी आमदारांकडून बोलण्यात अडथळा आणला. तेव्हा पडळकरांनी ओ, तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहात काय? तुम्ही काय सांगताय मला, अशा शब्दांत दरडावले.

महाराष्ट्र सरकार मुलांच्या आयुष्याशी खेळतंय, न्यासाच्या दलालाची ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरतेय, तो नोकरीची हमी देत होता. त्यात रेट कार्डचा उल्लेख आहे, ते खरं आहे का? त्याची चौकशी केली का? त्याने क गटासाठी १५ लाख रुपये, ड गटासाठी ८ लाख रुपये, याची तुम्हीच चौकशी केली का, जर हे घडलं असेल तर परीक्षेच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहात? असे प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारले.

gopichand padalkar
ठाकरे सरकारने अहंकाराने आम्हा १२ आमदारांना निलंबित केलेय : आशिष शेलार

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर देताना ऑडिओ क्लिपचे तथ्य तपासण्यात येईल, त्यात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती दिली. सगळ्यांचे समाधान करण्याची माझी तयारी आहे, जो तपास चालेल, त्याची पाळेमुळे ज्याच्यापर्यंत असतील ती खोदून काढू, ज्याच्याशी लिंक असेल त्याला शिक्षा देऊ, पडळकर म्हणतात तो दलाल कोण, ऑडिओ क्लिप याचा सायबर क्राइम तपास करते, आरोग्य विभागाने स्वत: एफआयआर केला आहे. तसंच परीक्षा पद्धती बदलण्याचे संकेतही राजेश टोपे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.