नाशिक येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
मागील दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) बेमुदत आंदोलन केले. दरम्यान प्रलंबित मागण्या आणि होणार त्रास यामुळे अहमदनगर येथील एका कर्मचाऱ्याने एसटीच्या मागच्या बाजून गळफास लावून आत्महत्या केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने (maharashtra Government) मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यानंतर नाशिक येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्वीट करुन ठाकरे सरकार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
पडळकर यांच्या या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. ते म्हणतात, स्वत:चा पोरगा बसवलाय मंत्रीमंडळाच्या मखरात आणि एसटी कामगारांची मुलं मात्र धाडलेत मृत्यूच्या दारात. युवराजांचे बाबा झाले 'एसटी' कामगरांचे यमराज असा गंभीर आरोपही त्यांनी या ट्वीटद्वारे केला आहे. दरम्यान ही टीका त्यांनी एका कार्टूनद्वारे दर्शित केली आह. यात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, त्यांचा कमी पगार, कामगारांना बडतर्फची नोटीस आणि एसटी कर्मचाऱ्याचा मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न असे चित्रे काढली आहेत.
दरम्यान, अहमदनगर येथील एसटी कर्मचाऱ्याने नुकतीच केलेली आत्महत्येच्या विषयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon)येथील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेने राज्याभर खळबळ उडाली. वडिलांना कमी पगार असल्याने उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक अडचण येत असल्याच्या नैराश्येतून त्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या तरुणाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.