Maharashtra Politics: "अजित पवार लोकं तुम्हाला जोड्याने मारतील", पडळकरांची जहरी टीका

अजित पवार यांच्यावर जहरी टीका
gopichand padalkar
gopichand padalkarsakal media
Updated on

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या वक्तव्यांमुळं चर्चेत आले आहे. अशातच त्यांनी आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. कोण अजित पवार ? असं म्हणत मी नुसतं बोलतोय लोक आता जोड्याने मारतील, अशी सडकून टीका पडळकर यांनी अजित पवारांवर केली.

दोन दिवसांपूर्वी, गोपीचंद पडळकर यांनी अरे तुरेची भाषा करत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यानंतर आता अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

gopichand padalkar
Maharashtra Politics: युतीच्या बिघाडीची चर्चा तर भाजपचे हायकमांड महाराष्ट्र दौऱ्यावर; राजकीय घडामोडींना वेग

काय म्हणाले पडळकर?

तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांवर सडकून टीका केली. ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

gopichand padalkar
Cabinet Expansions: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! भाजप, सेनेच्या 'या' आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

संजय राऊतांबाबत विचारले असता ते म्हणाले, तुम्ही पवाराच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे ? अरे दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. या राष्ट्राला पुढे न्यायचं काम करतात. प्रत्येक राज्याला भरीव असा निधी देतायेत.

देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान इतक्या वर्षानंतर देशाला मिळालाय. जगाच्या बाजारपेठेमध्ये देशाची उंची वाढवण्याचे फार मोठे काम केले. त्यामुळे लोक काय बोलतात ? याला फार महत्व देण्याचे काही काम नाही. अस म्हणत पडळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली.

gopichand padalkar
Maharashtra Politics: नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली; शिवसेनेनं भाजपला सुनावलं

शरद पवार यांच्यावर बोलताना पडळकरांची जीभ घसरली

गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी पवार का नाही आलेय़. पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. बारा वर्षे केंद्रात मंत्री होते.

मागं कधी होते मला माहिती नाही, गेल्या वर्षी त्यांना आपली चौन्डी गाव काढून घ्यायचे होती. त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौन्डी जागृत ठेवली पाहिजे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ही टीका करताना पडळकर वारंवार पवार यांचा एकेरी उल्लेख करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.