'आमचं ठरलंय, त्यामुळं दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नका'

Rohit Pawar vs Pravin Darekar
Rohit Pawar vs Pravin Darekaresakal
Updated on
Summary

'दरेकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलंय.'

राजकारणाच्या पलिकडं असतं, तसंच कर्तृत्व स्व. मुंडे साहेबांचं असल्यानं ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून, सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं स्व. मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब (BJP leader Pravin Darekar) आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु, तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली, हे आश्चर्यकारक आहे. असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP leader Rohit Pawar) यांनी व्यक्त केलंय.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा काल आठवा स्मृतिदिन होता. गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन (Gopinath Munde Death Anniversary) दरवर्षी 3 जून रोजी गोपीनाथगड (Gopinath Gad) इथं साजरा होतो. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केलीय.

फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवारांनी लिहिलंय की, राजकारणाच्या पलिकडं असतं, तसंच कर्तृत्व स्व. मुंडे साहेबांचं असल्यानं ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून, सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं स्व. मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु, तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली, हे आश्चर्यकारक आहे.

Rohit Pawar vs Pravin Darekar
अमित शाह ॲक्शन मोडमध्ये; 'टार्गेट किलिंग'बाबत अजित डोवालांसोबत 2 महत्वपूर्ण बैठका

कदाचित; मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपमध्ये आल्यानं आपणास मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो... पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार, असाही घणाघात त्यांनी दरेकरांवर केलाय.

Rohit Pawar vs Pravin Darekar
पंडितांच्या हत्येवर सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, 'अमित शहांनी क्रीडामंत्री व्हावं'

लोकांच्या मनामध्ये 2014 चे खरे मुख्यमंत्री कोण होते तर ते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) होते. दुर्वैवाने त्या गोष्टी घडल्या नाहीत. आपल्या सोबत ते नाहीत. ते असते तर राजकारणाची (Politics) पातळी एवढ्या खाली गेली नसती तर राजकारणाची पातळीवर असली असती. विरोध झाला असता. काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांमध्ये वाद झाला असता. पण, पातळी सोडून व संस्कृती सोडून काढे कोणी बोललं नसतं जर मुंडे साहेब त्या ठिकाणी असते. आज ते आपल्यात नसले तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात, ध्यानात आहेत. आपण त्यांचा विचार घेऊ त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, समाजकारण केलं, लोकांची सेवा केली आपणही त्या पद्धतीनं काम करायचं असल्याचं मतही आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.