NCP Political Crisis : कधीही न फुटलेल्या किंवा बंड न झालेल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार यांच्या रूपाने मोठं बंड झालं. ते आपल्यासोबत जवळपास ३५ आमदारांना घेऊन शिंदे फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाले आणि शरद पवार हा योद्धा एकटाच पडला. दिग्गज अन् आत्तापर्यंत निष्ठावंत राहिलेले नेते सोडून गेल्यामुळे अनेकांना धक्का बसला. हे राजकारण पाहून गोपीनाथरावांच्या त्यावेळच्या वक्तव्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या चुलत्यांसोबत मतभेद झाल्यानंतर ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे त्यांना सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या भाषणात मनाला टोचणारं आणि मार्मिक वक्तव्य केलं होतं. मुंडे म्हणाले होते की, "काय झालेय या राज्यातील सगळ्या पुतण्यांना? बाळासाहेबांना त्रास झाला. मला त्रास झाला. शरद पवार तुमची बारी आलेली दिसतेय आता..." गोपीनाथ मुंडे यांचा तो जुन्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्याचं राज्यातलं राजकारण पाहता गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याबाबत त्यावेळी केलेली भविष्यवाणी खरी ठरली असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्रात चुलता पुतण्याच्या राजकारणाने कधीच सोबत भरारी घेतली नाही. पुत्रमोहापायी अशा अनेक चुलता पुतण्यांच्या राजकारणामध्ये तूट झाल्याचा इतिहास महाराष्ट्राला लाभलाय. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, जयदत्त क्षीरसागर, अनिल देशमुख, सुनील तटकरे अशा दिग्गज नेत्यांचा सामावेश आहे.
दरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादीसोबत बंड करून आपल्यासोबत जवळपास ३५ आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर पक्ष आमचाच आहे, पक्षाचे प्रमुखही शरद पवार हेच आहेत आणि त्यांच्याच संमतीने आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर शरद पवारही तेवढ्याच जोशाने लढण्यासाठी तयार झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.