निवडणूक, जनगणनेच्या कामातून सुटका नाहीच ! शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षकांच्या कामांचे शैक्षणिक व अशैक्षणिक गटात वर्गीकरण

शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले. त्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा आदेश दिला आले. मात्र, जनगणना, आपत्ती निवारणाची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकांची अशैक्षणिक कामे करावीच लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
election
electionsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले. त्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा आदेश दिला आले. मात्र, जनगणना, आपत्ती निवारणाची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकांची अशैक्षणिक कामे करावीच लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई केली आहे. त्यानुसार मुलांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस, उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असताना शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासावर याचा परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटनांकडून दिली जाणारी निवेदने, आमदारांकडून होणारी मागणी विचारात घेऊन शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे वर्गीकरण करून सरकारला अहवाल सादर केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागांकडून परंपरागत जी कामे शिक्षकांना दिली जातात, शिक्षकांचा संबंध नसलेली माहिती भरण्याची कामे, अन्य साधने वापरून पूर्ण करता येऊ शकतात, अशी कामे अशैक्षिक आहेत.

शैक्षणिक कामे

अध्यापन, यू डायस आणि सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरून त्याचे अद्ययावतीकरण करणे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन जवळच्या शाळेत नावनोंदणी करणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण व संबंधित कार्य, गैरहजर मुलांच्या पालकांच्या उद्‍बोधन करणे, शाळापूर्व तयारी, शाळेत दखलपात्र मुलांचा शोध, शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसलेली माहिती मागवणे, अभिलेखे जतन करणे, विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीकडे लक्ष देणे, शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेणे, कला-क्रीडा स्पर्धा, अभ्यास सहलींचे आयोजन, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके विकसन, संशोधन आणि मूल्यमापन विकसन, प्रशिक्षण रचना त्यानुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे, शाळा स्तरावरील विविध समित्यांवरील विविध कामे शैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली.

अशैक्षणिक कामे

गावातील स्वच्छता अभियान, प्रत्यक्ष निवडणुकीतील कामे वगळता अन्य निवडणूकविषयक नियमित कामे, पाणंदमुक्त अभियान, विविध प्रकारची सर्वेक्षणे, शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून ती त्या विभागाचे उपयोजन किंवा संकेतस्थळावर भरणे, ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागविणे, शासन मान्यता नसलेल्या कामात सहभाग, शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांकडून दिली जाणारी कामे अशी कामे अशैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली. अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याचा आदेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.