Old Pension: जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर तोडगा

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला होता. त्यामुळं अनेक सरकारी सेवा ठप्प झाल्या होत्या.
Satyajeet Tambe supports protest of Maharashtra State Old Pension Union mumbai politics
Satyajeet Tambe supports protest of Maharashtra State Old Pension Union mumbai politicssakal
Updated on

मुंबई : जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला होता. त्यामुळं अनेक सरकारी सेवा ठप्प झाल्या होत्या. पण आज मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर अखेर हा संप मागे घेण्यात आला. कर्मचारी संघटनेच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (Government employees strike finally called off after CM Eknath Shinde statement in VidhanSabha regarding old Pension)

Satyajeet Tambe supports protest of Maharashtra State Old Pension Union mumbai politics
Old Pension: जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा; सरकारी कर्मचारी संप मागे घेणार?

कर्मचारी संघटनांची बैठक

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत जुन्या पेन्शनबाबत निवेदन दिलं. यानंतर सर्व राज्य सरकारी आणि निमसरकारी संघटनांची ऑनलाई बैठक घेण्यात आली. त्यानंतर एकमतानं संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

Satyajeet Tambe supports protest of Maharashtra State Old Pension Union mumbai politics
Parliament: संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! सरकारला धारेवर धरणाऱ्या 15 खासदारांचं निलंबन

मुख्यमंत्र्यांनी घेतली होती भेट

दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या कर्मचाऱ्यांची भेट घेत आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत असं म्हटलं होतं. तरी देखील या कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला होता. पण आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानं हा संप मागे घेण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

Satyajeet Tambe supports protest of Maharashtra State Old Pension Union mumbai politics
Old Pension: जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा; सरकारी कर्मचारी संप मागे घेणार?

मुख्यमंत्र्यांनी काय दिलंय आश्वासन?

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, जुन्या पेन्शनसंदर्भातील अहवाल सरकारला प्राप्त झाला असून या अहवालावरील चर्चा आणि अंतिम निर्णय या तत्वाशी सुसंगत असेल. या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल. मी सभागृहाला ग्वाही देतो की, संघटनेंच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे. त्यामुळं संघटनेनं सुरु केलेला संप त्वरीत मागे घ्यावा.

श्रीवास्तव समितीनं सुचवलेल्या तरतुदींचा सविस्तर अभ्यास करणं आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांना देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.