Government Jobs : पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची मोठी भरती, विखे पाटलांची माहिती!

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil
Updated on

Government Jobs | मुंबई : पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.  राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती जाहीर करु, अशी घोषणा विखे पाटील यांनी यापूर्वी दिली होती. त्याची पूर्तता झाली आहे.

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात आली होती. त्यामुळे विखे पाटील यांनी आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही भरती राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जाईल. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.  

Radhakrishna Vikhe Patil
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्ग बनवताना अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची  ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची  ०२  पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३  पदे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञची  ०४  पदे, तारतंत्रीची  ०३  पदे, यांत्रिकीची  ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२  पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३  रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Samruddhi Expressway: इंटिलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे रोखणार 'समृद्धी'वरील अपघात; फडणवीसांनी सांगितली सिस्टिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.