'राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करतायत'

माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे.
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakure sakal
Updated on

मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी पक्षांनी घोषणा दिल्या. त्यामुळे ते अभिभाषण अर्ध्यावरच सोडून गेले. तसेच कोश्यारी हे राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थित नव्हते. यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलयं. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. (Governor Bhagat Singh Koshyari Purposefully Spoil Politics Of Maharashtra, Say Yashomati Thakur)

Adv. Yashomati Thakur
आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपासमार, राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधून दिला धीर

माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे. राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणार भाषण करायचंच नव्हतं असं दिसतयं. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.