राज्यपाल कोश्यारींनी फिरवला सरकारचा निर्णय; विशेषाधिकार वापरुन केला हस्तक्षेप

bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray sakal
Updated on

पुणे: अहमदनगर रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ड. सुनील पोखरकणा यांचं निलंबन रद्द करण्यात आलं असून त्यांना जवळच्या शिरुरमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे. आपले विशेषाधिकार वापरुन राज्यपालांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतो आहे.

bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
काश्मीर फाईल्स पाहून काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात, 'सगळं काही अर्धवट, नुसतीच हिंसा!'

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. ६ नोव्हेंबरला आग लागलेली होती. आयसीयू वार्डमधील या आगीमुळे चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी चार जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांना जामीनही मंजूर झाला होता. मात्र, सुनील पोखरणा यांची अटक व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, आता त्यांचं निलंबन रद्द होऊन त्यांना जवळच्याच जिल्ह्यात सोयीच्या ठिकाणी ग्रामीण जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरुन ही बदली केली आहे.

bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
जपाननंतर इराणमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; 20 लाख घरांची बत्ती गुल

या सगळ्यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना पदस्थापना शिरुरमध्ये देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. या प्रकरणी राज्य सरकारने कारवाई करुनही राज्यपालांनी विशेषाधिकार वापरुन जवळच्या ठिकाणी पदस्थापना दिली आहे तसेच त्यांचं निलंबनही रद्द केलं आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. मात्र, हा अहवाला अद्याप उघड करण्यात आला नाहीये. या साऱ्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.