भगत सिंह कोश्यारीनंतर राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस हेदेखील वादाच्या विळख्यात अडकले आहेत. 'जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला', असं वक्तव्य बैस यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (governor ramesh bais controversy statement Janjira Fort maharashtra politics)
काल ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बैस यांनी जंजिरा किल्ल्याचा चुकीचा इतिहास सांगितला. (Latest Marathi News)
काय म्हणाले बैस?
जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला. बाजीराव पेशव्यांना विसरून चालणार नाही, जंजिरा किल्ल्याला त्यांनीच मुक्त केल, असं विधान रमेश बैस यांनी केलं आहे. राज्यपालांच्या चुकीच्या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजीराव पेशव्यांबाबत राज्यपालांना चुकीची माहिती कुणी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय. (Marathi Tajya Batmya)
इतिहास काय?
सतराव्या शतकात अंबर सिद्दीनं जंजिरा किल्ल्यावर (Janjira Fort) आपली सत्ता प्रस्थापित केली, पुढे ३३० वर्षे जंजिरा किल्ला त्यांच्याकडेच राहिला. तसेच इंग्रजांच्या काळात सिद्दीनी मांडलिकत्व पत्करलं होतं. त्यामुळे सिद्दीच जंजिऱ्याचे किल्लेदार राहिले होते. स्वातंत्र्यानंतर संस्थान विलिनिकरण करण्यात आले. त्यावेळी जंजिरा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला.
भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला. तसेच महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते वादात सापडले होते. आता राज्यपाल रमेश बैस देखील जंजिरा किल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.(Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.