राज्यपाल बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली.
महाबळेश्वर : राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी किल्ले प्रतापगडास (Pratapgarh Fort) सहकुटुंब भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
या वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह किल्ले प्रतापगडावरील ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यपाल बैस यांनी स्वतः पायी किल्ला चढून जाऊन गडावरील भवानी मातेचे दर्शन घेऊन सहकुटुंब देवीची पूजा केली. तसेच गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी राज्यपाल बैस यांनी किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकांनी अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला.
राज्यपाल बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली. शिवकालीन खेडेगाव येथे इतिहासाचे चांगले जतन केले आहे. याठिकाणी पूर्वीच्या काळी लोकजीवन कसे होते, हे पाहायला मिळाले. हा इतिहास भावी पिढीला पाहावयास मिळतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.