मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील महिन्यात 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुढील महिन्यात 5 जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी कडाडून विरोध केलाय. उत्तर भारतीयांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, मगच अयोध्येत पाय ठेवावा, असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिलाय. त्यानंतर आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज (Govinddev Giriji Maharaj) यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय.
‘कालपर्यंत रामाचा विरोध करणारा रावण जरी असला; पण त्याला आज वाटलं की मी जावं आणि रामाचं (Ram) दर्शन घ्यावं तर त्याचं राम स्वागत करणार असेल तर आपण विरोध करणारे कोण आहोत,’ अशा शब्दात कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी प्रतिक्रिया दिलीय. 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही भगवान रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना नवीन गर्भगृहात करणार आहोत, अशी माहितीही गोविंददेव महाराजांनी दिली. नाशिक वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरूकुल वेद पाठशाळा) इथं ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राममंदिराविषयीची माहिती दिली.
अयोध्येत राम मंदिराचं काम वेगात सुरूय. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल 2019 मध्ये लागल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीराम जन्मभूमी न्यासाची स्थापन करण्यात आली. याचे कोषाध्यक्ष म्हणून गोविंददेव गिरीजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर कधी पूर्ण होईल याची माहिती दिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि त्याला होणारा विरोध यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दात मांडलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात (Raj Thackeray visit to Ayodhya) बोलताना ते म्हणाले, अयोध्येचे भगवान श्रीराम सर्वांचे आहेत. त्यामुळं कुणालाही वाटलं की अयोध्येत जावं आणि दर्शन घ्यावं. दर्शनावर कुणाचा प्रतिबंध असणं मला योग्य वाटत नाही. कुणीही असेल कालपर्यंत रामाचा विरोध करणारा रावण जरी असेल, पण त्याला आज वाटलं की मी जावं आणि दर्शन घ्यावं तर त्याचं राम स्वागत करणार असेल तर आपण विरोध करणारे कोण आहोत. त्यामुळे रामाच्या दर्शनाकरिता कुणाचाही विरोध होता कामा नये, अशी माझी प्रांजळ भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.