मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आजोजित करण्यात आली. या सभेला राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधवांनी हजेरी लावल्याचे पाहयाला मिळाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी सरकारकडे आता फक्त १० दिवस उरले असल्याची आठवण जरांगे यांनी राज्य सरकारला करून दिली.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी ३० दिवस झालेत अजून १० दिवस आहेत. आज हा लाखोंचा जनसागर अंतरवालीत उसळला आहे, त्यांचं एकच म्हणणं आहे. राहिलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजाने जो शब्द दिला आहे, त्या शब्दावर तो आजही ठाम आहे. ४० दिवस आम्ही एक शब्दही सरकारला विचारणार नाही असा शब्द दिला होता.
तुमच्या हातात आणखी १० दिवस आहेत, या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर ४०व्या दिवशी सांगू, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
1) मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
2) कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
3) मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
४) दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात
5) PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे
6) महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.