Govt job : मोठी बातमी! शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ; आता अर्जदार...

job
jobesakal
Updated on

मुंबई - राज्य शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता नोकरभरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहिल, असं सांगण्यात आलं आहे.

job
Crime News : कोरोना काळात पॅरोलवर सुटलेले 350 कैदी परतलेच नाही; आता पोलिसांना...

राज्य शासनाच्या विविध विभागात ७५ हजार पदांच्या नोकरभरतीची घोषणा सरकारने केली होती. या नोकरभरतीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सरळसेवा भरतीच्या माध्यमातून नोकरभरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने ७५ हजार पदांची नोकरभरतीची घोषणा केली आहे. मात्र कोरोनात दोन वर्षे गेले होते. त्यामुळे स्पर्धा परिक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली होती.

job
Shivrajyabhishek Mahotsav : ३५० व्या शिवराज्याभिषेक महोस्तवासाठी सुचना पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही, त्यामुळे वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाली असून वयोमर्यादेत दोन वर्षे वाढ कऱण्यात आली आहे. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्षे वयोमर्यादा होती. ती आता ४० करण्यात आली आहे. तर मागास वर्गातील ४३ ऐवजी ४५ वयोमर्यादा असेल. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या परिक्षांची जाहिरात येईल, तोपर्यंत वयोमर्यादेतील वाढ लागू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()