Graduate Constituency Election : महाविकास आघाडीत दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेची कोंडी?

Graduate Constituency Election
Graduate Constituency Election
Updated on

Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील ५ जांगासाठी ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. सोमवारी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काल (सोमवार) या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये बंड तर शिवसेनीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

सोमवारी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यामध्ये ठाकरे गटाने देखील नागपूर मधील अर्ज मागे घेतला. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसून आली. या सर्व प्रकारामध्ये भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

या निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेला मतदार संघ म्हणजे नाशिक. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहेत. तांबे यांनी अपक्ष लढणार आहेत तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे अधीकृत उमेदवार विक्रम काळे यांना देखील बंडखोराचा सामना करावा लागेल. काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

Graduate Constituency Election
Sanjay Raut : "दावोसमध्ये कितीही करार झाले तरी..." ; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा

नागपूर मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार माघार घेतली आहे. तरी देखील २२ उमेदवारी रींगणात आहे. भाजपने शिक्षक परिषदेच्या नागो गाणार यांना पाठींबा दिला आहे. नागो गाणार यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या गोटातील ३ उमेदवार रींगणात आहेत.

ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटात नाराजीचे सुर उमटले आहेत. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातील परीष्ठ नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे नागपुरात महाविकास आघाडीत ठाकरे गटाची कोंडी झाली आहे.

Graduate Constituency Election
Satyajeet Tambe: सत्यजित तांबे काँग्रेसला रामराम ठोकणार? राजकीय घडामोडींना वेग

अमरावती पदवीधर निवडणुकीत देखील शिवसेनेची काँग्रसने कोंडी केली. भाजपचे रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात ही निवडणूक होणार आहे. धीरज लिंगाडे हे ठाकरे गटाचे उमेदवार होते पण काँग्रेसने हा उमेदवार एका रात्रीत पळवला.

धिरज लांडगे यांनी १० जानेवारीला रात्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून काँग्रेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे संजय राऊत यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. धीरज लिंगाडे हे बुलडाण्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. अमरावती पदवीधरसाठी ठाकरे गटाने दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती.

Graduate Constituency Election
अर्जुन खोतकरांच्या जावयावर मोठी कारवाई; क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.