राज्यातल्या १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय

राज्यातल्या १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय
Updated on

मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. राज्यातल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे.

सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ८ जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण यात घोडेबाजार होणार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. असे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेतला आला. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी १४ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारी महिन्यात काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होईल. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे प्रमाणपत्र नसल्यास ते विहित कालावधीत सादर करण्याचे हमीपत्र देणं बंधनकारक आहे. 

३१ डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि १५ जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. तर १८ जानेवारीला मतमोजणी होईल.

Gram panchayat election 2021 sarpanch hasan mushrif 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.