Gram Panchayat Election Result : वाह रे पठ्ठ्या! पत्नीच्या विजयामुळे ३ वर्षांनी करणार दाढी-कटींग

Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Result
Updated on

पंढरपूर - राज्यभरात सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडण्यात आले आहेत. मात्र राज्यातील एकंदरी चित्र भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सरशी झाल्याचं चित्र आहे. निवडणुकीतील विजयी उमेदवार जल्लोष करत आहेत. मात्र पंढरपूर तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयाची चर्चा होत असून विजयी उमेदावाराच्या पतीने पुष्पास्टाईल आनंद साजरा केला.

Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Result : ठाकरे गटाला दिलासा! शिवशक्ती-भिमशक्तीचा पहिला विजय साकार

पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत अमरजीत पवार यांनी गावात राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय केस आणि दाढी कापणार नसल्याचा नवस केला होता. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून ते दाढी आणि केस वाढवत होते. मात्र आज लागलेल्या निकालात पवार यांच्या पत्नी विजयी झाल्या. पत्नीच्या विजयानंतर अमरजीत यांनी एकच जल्लोष केला. तसेच विजयानंतर पुष्पामधील डायलॉग मारत 'झुकेगा नही साला म्हणत' अमरजित यांनी आनंद साजरा केला.

Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Result : जिल्ह्यात BJPची सरशी झाल्याचा पंकजांचा दावा; पण परळीत...

दरम्यान ग्रामस्थांनी आपल्याला विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार म्हणत अमरजीत यांनी गावाचा विकास घडवून आणण्याचं वचन दिलं आहे. तसेच आपले केस मोठ्या प्रमाणात वाढले असून आगामी काळात तिरुपती बालाजी येथे जावून केस अर्पण करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. गावातील ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनीच माझा नवस पूर्ण केल्याचंही अमरजित यांनी नमूद केलं.

अजुनही अनेक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल येणं बाकी आहे. यंदा निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवाय यामुळे सदस्य पळवापळवीला ब्रेक लागणार आहे.

हेही वाचा असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.