संगमनेर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये राज्यातील सर्वाच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पहायला मिळते आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्ती या निवडणुकीच्या निकालामुळं चर्चेत आल्या आहेत. यांपैकी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरपंच बनल्या आहेत. (Gram Panchayat Election Result Indurikar Maharaj mother in law becomes Sarpanch)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांकडून ही सरपंचपदाची निवडणूक लढवलेली नाही, तर अपक्ष म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला आणि ग्रामस्थांनी त्यांच्यावर पूर्णतः विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, किर्तनाच्या क्षेत्रात नावाजलेलं नाव असलेले प्रसिद्ध हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर हे शशिकला पवार यांचे जावई असल्यानं त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर निश्चित दिसून आला आहे. इंदुरीकर महाराज ग्रामीणभागात आपल्या खास विनोदी शैलीतील किर्तनासाठी ओळखले जातात.
हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.