Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुती सुसाट! CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींचे हात...

राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होत आहेत.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeEsakal
Updated on

मुंबई : राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १२७७ जागांवर महायुतीनं दमदार विजय मिळवला आहे. तर ४९७ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तसेच ३४१ जागा या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त इतर पक्षांना मिळाल्या आहेत. एकूणच या निवडणुकांमध्ये महायुती सुसाट निघाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Gram Panchayat Election results CM Eknath Shinde first reaction on it)

Chief Minister Eknath Shinde
Namdeorao Jadhav: "...तर 16 टक्के आरक्षण आम्हाला तेव्हाचं मिळालं असतं"; नामदेवराव जाधवांचा शरद पवारांवर निशाणा

प्रकल्पांना आमची चालना

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला आहे, मी मतदारांचे धन्यवाद मानतो. महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देण्याचं काम केलं आहे. सर्वांना न्याय देण्याचा काम आमच्या सरकारनं केलं. शासन आपल्या दारी खरोखर लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले म्हणून हा निकाल आपण आता पाहतो आहोत. (Latest Marathi News)

Chief Minister Eknath Shinde
Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत शहाजी बापू पाटलांनी गाव राखलं, पण चारपैकी तीन...

जबाबदारी वाढली

टोमणे आरोपांवर वर्ष घालवलं एकही दिवस असा सोडला नाही, हे लोकांनी नाकारलं आहे. ज्यांनी मतदारांची प्रतारणा केली त्याला मतदारांनी घरी बसवलं. आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही आणखी काम करू आणखी उद्योगांना आणू, असं आश्वासनंही यावेळी मुख्यंत्र्यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

Chief Minister Eknath Shinde
Narayangaon Grampanchyat Election Result : लोकनियुक्त सरपंचपदी डॉ. शुभदा वाव्हळ यांची निवड

४५ पेक्षा जास्त जागा घेऊ

सर्व समाजानं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झालं. घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये महायुतीचा असाच विजय होत राहिलं. आता लोकसभेला 45 पेक्षा जास्त जागा आम्ही घेऊ आणि मोदींचे हात अजून बळकट करू, असंही मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.