Gram Panchayat Election : निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हॅंग; शासनाचा उमेदवारांना दिलासा

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election esakal
Updated on

सटाणा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार्‍या इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) चालत नसल्याने राज्यभरासह तालुक्यात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्र जागून काढावी लागत आहे. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (ता.२) रोजी अखेरचा दिवस असल्याने इच्छुकांची मोठी धावपळ बघायला मिळत आहे. आयोगाचे संकेतस्थळ हॅंग होत असल्याने अनेक इच्छुक निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुप्रिया सुळेंची ट्विटद्वारे शासनाला विनंती

संकेतस्थळाबाबत असलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. जेणेकरुन उमेदवारांना अर्ज भरणे सोपे होईल असं ट्विट राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी करत शासनाला यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात १४ तालुक्यांमधील १७७ ग्रामपंचायती तर बागलाण तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. मात्र तालुक्यात दोन दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून पाचशेहून अधिक इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. तालुक्यातील आदिवासी अशिक्षित उमेदवारांना कागदपत्रे जमवाजमव करून ऑनलाइन अर्ज भरणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दोन-दोन दिवस लागत आहे.

Gram Panchayat Election
Vijay Deverakonda: 'ईडीनं बारा तास बसून ठेवलं, माझ्यासारख्या व्यक्तीसोबत तर...' विजय भावूक

अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक...

उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे. मात्र सध्या अर्ज भरताना संकेतस्थळ हँग होत असल्यामुळे उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे कसे? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसमोरं उभा आहे. एका ग्रामपंचायतीसाठी ४० ते ५० अर्ज असल्यामुळे अनेक उमेदवारांना अद्यापही अर्ज भरता आलेले नाहीत.

भावी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र त्यातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरशः ऑनलाईन केंद्रांवर नंबर लावून बसले आहेत. अर्ज भरण्यासाठी नंबर लागत नसल्याने काही इच्छुकांनी रात्रही जागून काढली आहे. मात्र तरीही वेबसाईट चालत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

''उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) चालत नसल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना मोठी अडचण येत आहे. त्यातच अर्ज भरण्यासाठी उद्या शुक्रवारी शेवटची मुदत असल्याने अनेक इच्छुक निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्याची परवानगी द्यावी.'' - नंदकिशोर शेवाळे, अध्यक्ष, ग्रामस्वराज्य सेवा संघ

ऑफलाईन अर्ज करता येणार...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) चालत नसल्याने आता ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्विकारले जातील असे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्यकृष्णमुर्ती यांनी काढले आहे. याद्वारे उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

esakal
Gram Panchayat Election
Uddhav Thackrey: आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे रंगली चर्चा

असा आहे निवडणूक कार्यक्रम...

अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर

अर्ज छाननी : ५ डिसेंबर

अर्ज माघारीची दिनांक : ७ डिसेंबर

मतदान : १८ डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.