Grampanchayat Member: गाव पुढाऱ्यांसाठी मोठी बातमी! पराभूत ग्रामपंचायत उमेदवारांना हायकोर्टाने का घोषित केले विजयी? काय आहे प्रकरण?

Grampanchayat Election: जोपर्यंत फेरमतमोजणी होत नाही तोपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याला आपण केलेल्या निकालाचे पुनरावलोकन करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार नाही,
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionEsakal
Updated on

नेरी मानकर ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने प्रथम दोन सदस्य निवडून आल्याचे घोषित केले व नंतर मतांची फेरमोजणी न करता स्वतःचा जाहीर केलेला निकाल बदलला.

परंतु, जोपर्यंत फेरमतमोजणी होत नाही तोपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याला आपण केलेल्या निकालाचे पुनरावलोकन करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, निकाल रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला.

यामुळे, प्रथम निवडून आलेले सदस्य पूनम कोडापे व अनिल लोहे यांना दिलासा दिला. न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी हा निर्णय दिला.

हिंगणा येथील नेरी मानकर ग्रामपंचायतीची निवडणूक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली. या निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. निवडणुकीत पूनम कोडापे व अनिल लोहे हे सदस्य म्हणून विजयी झाले. पूनम यांना ३३४ आणि अनिल यांना ३०९ मते मिळाली. पूनम यांच्या प्रतिस्पर्धी राजश्री टेकाम यांना २४४ तर अनिलचे प्रतिस्पर्धी निलेश पाटील यांना २७१ मते मिळाली.

रात्री ९.३३ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी पूनम कोडापे व अनिल लोहे यांना निवडून आल्याचे घोषित केले. रात्री ११.२० वाजता नीलेश पाटील यांनी निकालावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केला पाटील यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी मंजूर केला.

मात्र, त्यापूर्वीच मुख्य कोषागार कार्यालयात ईव्हीएम मशिनची मेमरी जमा करण्यात आली. त्यामुळे, फेरमतमोजणी होऊ शकली नाही. त्यानंतर, मतमोजणीसाठी वापरलेल्या व्हीएम फॉर्म क्रमांक ४ मध्ये चुकीची नावे टाकली गेल्याचा दावा करीत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घोषित निकालात सुधारणा केली. त्यामुळे, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी २.२३ वाजता पूनम कोडापे आणि अनिल अनिल लोहे यांच्याऐवजी राजश्री टेकाम आणि नीलेश पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे, पूनम आणि अनिल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Grampanchayat Election
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते विधानसभा निवडणूक; मतदान अन् निकालाची संभाव्य तारीख समोर

न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय रद्द करीत पूनम आणि अनिल यांच्या विजयाचा आधी जाहीर केलेला निकाल कायम ठेवला. न्यायालयाने प्रतिवादी सदस्य राजश्री आणि नीलेश यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५ नुसार संबंधित प्राधिकरणासमोर निवडणूक याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सी. एफ. भगवानी आणि राज्य शासनातर्फे अॅड. आय. जे. दामले यांनी बाजू मांडली.

Grampanchayat Election
Maharashtra Weather Updates: राज्याला पाऊस झोडपणार! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.