कोल्हापूर/नाशिक - राज्यात रविवारी (ता. ५) पार पडलेल्या २,३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी विजय मिळविल्याचा दावा सत्ताधारी महायुतीने केला. सुमारे १,५०० पेक्षा अधिक जागांवर महायुतीने विजय मिळविल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाविकास आघाडीने जवळपास ८९१ जागा जिंकल्याचा दावा केला.
मराठवाड्यात ‘बीआरएस’चा शिरकाव
बीड
१५८ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर. निवडणुकांत स्थानिक पातळीवर आघाड्या पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) कल.
भाजप सर्वाधिक जागांवर विजयी. शिंदे गट आणि ठाकरे गट, काँगेस व शरद पवार गटाचे समर्थक मोजक्या जागी विजयी. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायत बीआरएसने जिंकली.
गेवराईत, माजलगाव, परळी आणि बीडमध्ये अजित पवार गटाची बाजी. राष्ट्रवादी, केजमध्ये भाजप (रमेशराव आडसकर गट), आष्टीत भाजप (सुरेश धस गट)
जालना
जिल्ह्यात केवळ चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या
भोकरदन तालुक्यातील विटा/रामनगर ग्रामपंचायतीत अपक्षांची बाजी
जालना तालुक्यात बोरखेडी-काँग्रेस, वाघ्रुळ जहांगीर- काँग्रेस-राष्ट्रवादी, इंदलकरवाडी- शिंदे गटाच्या ताब्यात
परभणी
सेलू तालुक्यातील हिस्सी येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सात जागांवर विजय मिळवत आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले
जिंतूर तालुक्यातील लिंबाळा ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गटाचे पाच सदस्य विजयी. भाजपच्या बंडखोर गटातील चार सदस्यही विजयी
गंगाखेड तालुक्यातील इळेगाव ग्रामपंचायतीच्या नऊपैकी आठ जागांवर काँग्रेसचा विजय
हिंगोली
जिल्ह्यात सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत स्थानिक सत्ताधारी गटाचेच उमेदवार निवडून आले.
यामध्ये पूर्वीच १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी (ता.५) सात ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.
धाराशिव
जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिंदे गटाचे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत वर्चस्व. अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय आघाडीचे पॅनेल विजयी झाले
तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे प्रकाश चव्हाण यांनी पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व राखले
परांडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाची बाजी
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह ग्रामपंचायतींच्या नऊ जागांपैकी भाजपचे ७ तर काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले.
सिल्लोड तालुक्यात आसाडी येथे भाजप व शिंदे गट पुरस्कृत पॅनेल विजयी
पैठण तालुक्यात आडूळ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे तर कन्नड तालुक्यातील गुदमा ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व.
लातूर
जिल्ह्यात १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४३ ग्रामपंचायतींतील ५३ सदस्यांच्या जागांच्या पोटनिवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्ताधारी गटाचे सदस्य विजयी
चवण हिप्परगा, नागतीर्थ वाडी (ता. देवणी), ढोरसांगवी, रामपूरतांडा व मंगरूळ (ता. जळकोट) येथे भाजपने यश मिळविले.
नांदेड
जिल्ह्यात १९ ग्रामपंचायती आणि २५ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस आणि भाजपला संमिश्र यश. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा विजय झाला
नायगाव तालुक्यातील लालवंडी (भाजप), देगलूर तालुक्यातील मरतोळी (काँग्रेस), अंबुलगा (काँग्रेस) गोगला गोविंद तांडा (बीआरएस) हदगाव तालुक्यातील लोहा आणि गवतवाडी येथे काँग्रेसप्रणित आघाडीची बाजी
सोलापूर जिल्ह्यात भाजपचीच सरशी
सोलापूर - जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती आला असून त्यात भाजपने सर्वाधिक ४९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने १५ तर शिंदे गटाने १० ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पिछाडीवर राहिल्याचे दावे अन्य पक्षांनी केले आहेत. अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात भाजपलाच सर्वाधिक यश मिळाले. माढा व करमाळ्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तर सांगोल्यात शेकापला यश मिळाले. स्थानिक आघाड्यांमध्ये मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या फुटीचा परिणाम दिसून आला.
जळगावमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व
जळगाव : जळगाव तालुक्यात आज तेरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे उमेदवार सरपंचपदी निवडून आले असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विदर्भात काँग्रेस, भाजपचा विजयाचा दावा
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३५७ ग्रामपंचायती
काँग्रेस, भाजपचे विजयाचे दावे-प्रतिदावे
राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप समर्थित गटांना संमिश्र यश
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी ग्रामपंचायतीत ‘बीआरएस’ समर्थित गटाने खाते उघडले
बुलडाणा जिल्ह्यात भाजपचे आमदार संजय कुटे यांना ‘होमपिच’वरच धक्का
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी गड राखले
सिंधुदुर्गात पुन्हा भाजपचे वर्चस्व
ओरोस - सिंधुदुर्गात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखले आहे. जिल्ह्यातील २४ पैकी भाजपने १५, शिवसेनेच्या ठाकरे गटाने ५ तर गावविकास पॅनलने ४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आचऱ्यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकाविला. हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा एकही सरपंच निवडून आणता आला नाही. सर्वाधिक नऊ ठिकाणी मतदान झालेल्या देवगड तालुक्यांत शिवसेनेला एक तर भाजपला उर्वरित ९ ठिकाणी वर्चस्व मिळाले. मालवणमधील एकमेव आचरा ग्रामपंचायत भाजपकडे गेली.
वेंगुर्लेत भाजपकडे तीन आणि ठाकरे गटाकडे एक, कणकवलीत भाजप आणि ठाकरे गटाकडे प्रत्येकी एक तर दोडामार्गमधील तिन्ही ग्रामपंचायती गावविकास पॅनेलकडे गेल्या.
सांगली जिल्हा
महाविकास आघाडीला ८४ पैकी ४०; महायुती ३१ गावांत सत्ता
इतर १३ ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या
थेट सरपंच निवडीमुळे प्राथमिक माहितीनुसार सात ठिकाणी सत्ता एकाची आणि सरपंच वेगळ्या गटाची अशी स्थिती
भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि खासदार संजय पाटील समर्थक अरविंद तांबवेकर यांनी हरिपूरची सत्ता राखली
नांद्रे गावात काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला
कुंडल (ता. पलूस) मध्ये विधानपरिषद आमदार अरुण लाड यांच्या गटाने यश मिळवले
आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव वाढला
कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. आबा गट आणि घोरपडे गटाने प्रत्येकी सात गावांत सत्ता मिळवत मोठे यश मिळवले. भाजपची पिछेहाट झाली.
रत्नागिरी जिल्हा
एकूण १० ग्रामपंचायतींपैकी शिंदे गटाला ३, भाजपला १, अजित पवार गटाला २, ठाकरे गटाला २ तर स्थानिक आघाडी २ ग्रामपंचायतींत विजय
रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वर्चस्व अबाधित राखले.
भारतीय जनता पक्षानेही एक ग्रामपंचायत ताब्यात घेत ग्रामीण राजकारणात शिरकाव केला. मात्र ठाकरे गटाच्या हाताला फारसे काही लागलेले नाही.
दापोली तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती शिंदे गटाकडे. ठाकरे गटाला एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले
चिपळुणात तीनपैकी दोन
ठिकाणी अजित पवार गटाने वर्चस्व राखले. एका ठिकाणी गाव पॅनेलची सत्ता आली
कोल्हापूर जिल्हा
एकूण ७४ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायती बिनविरोध
निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले.
४९ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचाच विजय
नाशिक जिल्हा
महायुतीला कल, अजित पवार गटाचा दबदबा
४८ पैकी २२ ग्रामपंचायतींवर महायुतीचे वर्चस्व
महाविकास आघाडीने १५ ग्रामपंचायती जिंकल्या
मनसेचा दोन ग्रामपंचायतींत विजय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.