बदलत्या हवामानामुळे द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास १० दिवसांचा विलंब

उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणुका आणि बांगलादेशप्रमाणे देशातील तीन राज्यातील पावसामुळे द्राक्षांच्या मागणीत घट झाली आहे.
Grapes
Grapessakal media
Updated on

नाशिक : सतत ढगाळ हवामान, कमी सूर्यप्रकाश, थंडी-धुके अन अधिकची आर्द्रता अशा बदलत्या हवामानामुळे यंदा द्राक्ष पंढरी नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांच्या मण्यांमध्ये साखर उतरण्यासाठी १० ते १२ दिवसांचा विलंब झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन हजार टनाने द्राक्षांची निर्यात कमी झाली आहे. त्यातच, उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणुका आणि बांगलादेशप्रमाणे देशातील तीन राज्यातील पावसामुळे द्राक्षांच्या मागणीत घट झाली आहे.

शेतकऱ्यांची एकजूट करत द्राक्ष बागायतदार संघाने यंदापासून महिनानिहाय द्राक्षांची किंमत निश्‍चित केली आहे. त्यानुसार या महिन्यासाठी ७१ रुपये किलो असा भाव निश्‍चित केला आहे. द्राक्षांसाठी निर्यातीकरिता शेतकऱ्यांना ७२ ते ७८ रुपये किलो असा भाव मिळतो आहे. दरम्यान, गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातून १ हजार ८५० कंटेनरमधून २५ हजार ९५१ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा गेल्या दोन दिवसापर्यंत १ हजार ५३५ कंटेनरमधून २२ हजार ७४३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

रशियाचा हातभार अन चीनची प्रतीक्षा

द्राक्षांच्या निर्यातीत यंदा रशियामधील ग्राहकांनी हातभार लावला आहे. एकुण निर्यातीपैकी १२ हजार २६ टन द्राक्षांची रशियात निर्यात झाली आहे. गेल्यावर्षी १० हजार ७८ टन द्राक्षांची रशियामध्ये, तर १५ हजार ८७३ टन युरोपमध्ये निर्यात झाली होती. यंदा युरोपमध्ये १० हजार ७१७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्षांना मागणी वाढावी यासाठी चीनच्या ‘ग्रीन सिग्नल''ची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. बागेपासून पॅकहाऊस आणि पॅकींगपासून कंटेनरपर्यंतच्या प्रवासातील परीक्षण चीनसाठी हवे आहे. हे परीक्षण अंतीम टप्प्यात पोचले असून येत्या आठवडाभरात चीनची निर्यात सुरु होणे अपेक्षित आहे.

शिवाय विधानसभा निवडणुका सुरु असलेल्या राज्यातील किरकोळ विक्रेते निवडणूक प्रक्रियेत अडकल्याचे निरोप संबंधित राज्यातील व्यापाऱ्यांकडून मिळाले आहेत. त्याचवेळी बांगलादेशमधील पाऊस थांबल्याने येत्या आठवडाभरात बांगलादेशसाठी द्राक्षे रवाना होण्यास सुरवात होईल, असे द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निर्यातीत असलेली पिछाडी भरुन निघण्यास मदत होईल. देशातंर्गत मागणी वाढीस लागण्यातून द्राक्षांना चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.

- कैलास भोसले (महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ)

देशातंर्गत द्राक्षांना मिळत असलेला भाव (शेतकऱ्यांकडून खरेदी किलोला रुपयांमध्ये)

लांब मण्यांचे वाण

४० ते ४५

गोल मण्यांचे वाण

२५ ते ३५

ब्लॅक वाण-जम्बो आणि नाना परपल

८५ ते ९५

फ्लेम

७२ ते ७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.