भावी शिक्षकांसाठी मोठी बातमी! ‘टीईटी’ परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; रविवारी ५९८ केंद्रांवर परीक्षा; ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे राहणार परीक्षार्थींवर वॉच

यंदा पहिल्यांदाच परीक्षार्थींना तीन उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून त्यात एक मूळ उत्तरपत्रिका तर दोन कार्बनकॉपी असणार आहेत. त्यातील एक कॉपी विद्यार्थ्यांकडे, दुसरी प्रत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ठेवली जाणार आहे. जेणेकरून निकालापर्यंत कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहणार नाही हा त्यामागील हेतू आहे.
TET exam
TET examesakal
Updated on

सोलापूर : भावी शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या रविवारी (ता. १०) राज्यातील ५९८ केंद्रांवर पार पडणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीचे बायोमेट्रिक ठसे घेवून मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी व चेहरा स्कॅन करूनच परीक्षा केंद्रावर सोडले जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच परीक्षार्थींना तीन उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून त्यात एक मूळ उत्तरपत्रिका तर दोन कार्बनकॉपी असणार आहेत. त्यातील एक कॉपी विद्यार्थ्यांकडे तर दुसरी प्रत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ठेवली जाणार आहे. जेणेकरून निकालापर्यंत कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहणार नाही हा त्यामागील हेतू आहे.

‘टीईटी’ परीक्षेतील पूर्वानुभव ओळखून यावेळी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी यंदाची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेतली आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्याचे बोटाचे ठसे बायोमेट्रिक पद्धतीने घेतले जाणार आहेत. याशिवाय त्याच्या डोळ्याचे, चेहऱ्याचे स्क्रिनिंग देखील होईल. त्यात किमान ६८ टक्के चेहरा जुळावा असे अपेक्षित आहे. याशिवाय कोणी बनावट विद्यार्थी परीक्षा देत असल्यास त्याच्यावर तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी, केंद्रावर आल्यावर मेटल डिटेक्टरद्वारे त्याच्याकडे कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का, याचीही पडताळणी होईल. त्यामुळे परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावेच लागणार आहे.

परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही

यंदाच्या टीईटी परीक्षेत पहिल्यांदाच आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वर्गात कोणी परीक्षार्थींना उत्तरे सांगत असेल किंवा गैरप्रकार होत असेल तर ते थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेला समजणार आहे. याशिवाय परीक्षेत दरवर्षी दोन उत्तरपत्रिका असायच्या, पण यावेळी तीन उत्तरपत्रिका असतील.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र परीक्षा परिषद, सोलापूर

‘एआय’मुळे कॉपी करण्याला कायमचा पायबंद

टीईटी परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून ‘एआय’ तंत्रज्ञान वापरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. वर्गातील पर्यवेक्षक कोणाशी बोलत असेल किंवा उत्तरे सांगत असल्यास, केंद्र संचालक निवांत एकाच ठिकाणी बसून राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका द्यायला विलंब होत असल्यास त्यासंदर्भातील मेसेज थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेला मिळणार आहे. त्यानंतर अवघ्या ३० सेकंदात संबधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला जाईल.

परीक्षेसंदर्भातील आकडेवारी

  • पेपर-एकसाठी विद्यार्थी

  • १,५२,५९७

  • परीक्षा केंद्रे

  • ४३१

  • पेपर-दोनसाठी विद्यार्थी

  • २,०१,३३६

  • परीक्षा केंद्रे

  • ५९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.